________________
तत्त्वार्थसार अधिकार २रा
मिश्रगुणस्थान सम्यग्मिथ्यात्वसंज्ञायाः प्रकृतेरुदयाद् भवेत् । मिश्रभावतया सम्यग्मिथ्यादृष्टिः शरीरवान् ।। २० ॥
अर्थ-- सम्यग्मिथ्यात्व नामक दर्शनमोह प्रकृतीच्या उदयाने जीवाचे जे मिश्र परिणाम होतात, त्याना सम्यक्त्वरूप म्हणता येत नाही किंवा मिथ्यात्वरूप म्हणता येत नाही असे जात्यंतररूप मिश्रपरिणाम होतात त्यास मिश्र गुणस्थान म्हणतात.
या गुणस्थानातून जीव चढला तर चवथ्या गुणस्थानात जातो. व उतरला तर दुसऱ्यात किंवा पहिल्या गुणस्थानात जातो. याचा काल अंतर्मुहूर्त आहे. या गुणस्थानात मरण होत नाही. मरताना चवथ्यात किंवा पहिल्या गुणस्थानात जाऊन मरतो.
असंयत गुणस्थान वृत्त मोहस्य पाकेन जनिताविरतिर्भवेत् । जीवः सम्यक्त्वसंयुक्तः सम्यक्दृष्टिरसंयतः ।। २१ ॥
अर्थ- ज्या कमांच्या उदयाने संयम किंवा व्रतरूप परिणाम न होणे त्यास चारित्रमोहकर्म म्हणतात. चारित्रमोह कर्माचे चार भेद आहेत. १ अनंतानुबंधी', २ अप्रत्याख्यानावरण, ३ प्रत्याख्यानावरण, ४ संज्वलन.
१ अनंतानुबंधी- जे कषाय अनंत संसारपरिभ्रमणाला कारण असतात. ज्याच्या उदयाने जीवास सम्यग्दर्शन व स्वरूपाचरणचारित्रस्वरूप आत्मानुभूती होत नाही त्यास अनंतानुबंधी कषाय म्हणतात.
२ अप्रत्याख्यानावरण- ज्याच्या उदयाने जीव देशसंयम देखील किपित् व्रत-संयम-पाळू शकत नाही त्यास अप्रत्याख्यानावरण कषाय म्हणतात.
१ आद्या। सम्यक्त्व चारित्रे द्वितीया ध्नन्त्यणुव्रतं ।
तृतीयाः सयम नान्ति यथाख्यातं तुरीयका: ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org