SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 104
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ तत्त्वार्थसार अधिकार २रा ४ मिथ्यात्वकर्मस्थिति मंद होऊन ज्याचे परिणाम विशुद्ध झाले आहेत अशा जीवास देवदर्शन, शास्त्रस्वाध्याय, गुरूपदेश इत्यादि निमित्त सारणाची प्राप्ति होणे त्यास देशनालब्धि म्हणतात. ५ करणलब्धिचे तीन भेद आहेत. १ अधःकरण २ अपूर्वकरण ३ अनिवृत्तिकरण. १ अधःकरण- परिणामाच्या विशुद्धिची तर तमता, तीवमंदता होत असल्यामुळे वरील जीवाचे परिणाम (ज्यानी प्रथम सुरूवात केली आहे.) खालच्या जीवाच्या परिणामासारखे ( ज्यानी मागागहून गुरुवात केली आहे.) सदृश-विदृश होऊ शकतात त्या परिणामास अधःकरण परिणाम म्हणतात. __२ अपूर्वकरण- परिणामाची उत्तरोत्तर अपूर्व-अपूर्व विशुद्धि होणे यास अपूर्वकरण म्हणतात. ३ अनिवृत्तिकरण- अनेक जीवांच्या परिणामामध्ये निवृत्तिकरण ( भेद कमी अधिकपणा ) नसतो. सर्वाचे समान परिणाम असणे अनिवृत्तिकरण परिणामाच्या अंतसमया।यंत मिथ्यात्वाचा मंद उदय असल्यामुळे हा जीव मिथ्यादृष्टिच म्हटला जातो. अनिवृत्तिकरणाच्या अंतसमया मिथ्यात्न व अनंतानुबंधी मूलक ४१ प्रकृतीची बंधच्युच्छित्ति होते संवर-पूर्वक निर्जरा होते त्यामुळे उत्तर समयात या जीवास सम्यग्दर्शनाची प्राप्ति होते. १ चवथ्या गुणस्थानातून उतरताना जर मिथ्यात्व कर्माचा उदय आला तर जीव पहिल्या मिथ्यात्व गणस्थानात येतो. २ जर मिथ्यात्व कर्माचा उदय न येता केवळ अनंतानुबंधीचा उदय आला तर सम्यग्दर्शनापासून च्युत होऊन दुसरे सासादन गुणस्थानात येतो. ३ जर सम्बग्मिथ्यात्वकर्मप्रकृतीचा उदय आला तर तिसऱ्या मिश्र गुणस्थानात येतो. Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy