________________
५८
तत्त्वार्थसार अधिकार २ रा
हे गुणस्थान वर चढताना होत नाही उतरताना होते. प्रथम मिथ्यादृष्टि गुणस्थानातून जीव मिथ्यात्वमूलक १६ कर्मप्रकृति व अनंतानुबंधी मूलक २५ प्रकृतीचा अभाव करून एकदम चतुर्थ गुणस्थानात जातो. तेथे जेव्हा अनंतानुबंधीचा उदय येतो तेव्हा सम्यग्दर्शनापासून च्युत होतो परंतु मिथ्यात्वाचा उदय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मिथ्यात्व गुणस्थानात जात नाही. अशा मधल्या उतरत्या काळात हे गुणस्थान होते. सम्यक्त्वापासून आसादना-विराधना-च्युति या गुणस्थानात होते म्हणून या गुणस्थानास सासादन हे नाव दिले आहे. या गुणस्थानातून जीव नियमाने मिथ्यादष्टि होतो. जे कषाय परिणाम अनन्तसंसार परिभ्रमणाला कारण असतात त्याना अनंतानुबंधी कषाय म्हणतात.
मिथ्यादृष्टि गुणस्थानात मोक्षमार्ग स्वरूप सम्यग्दर्शन-ज्ञान-चारित्रस्त्ररूप र त्रय शक्तीचा प्रादुर्भाव होत नाही म्हणून मिथ्यात्व परिणाम हे जीवस्वभावाच्या निकृष्ट अवस्थेचे सूचक आहेत. त्यानंतर भव्य-संज्ञी पंचेद्रिय जीवास योग्य कालादिलब्धि प्राप्त झाली असताना क्षयोपशमलब्धि-विशुद्धिलब्धि-प्रायोग्यलब्धि देशनालब्धिपूर्वक जेव्हा करणलब्धिची प्राप्ति होते तेव्हा त्यास स्व-पर भेदविज्ञानपूर्वक आत्मोपलब्धि स्वरूप सम्यग्दर्शाची प्राप्ति होते. पहिल्या चार लब्धि तर अभव्य मिथ्यादष्टीला देखील होऊ शकतात. परंतु पाचवी करणलब्धि भव्य सातिशय मिथ्यात्वदृष्टिलाच प्राप्त होते. करणलब्धि झाल्याशिवाय सम्यग्दर्शनाची प्राप्ति होत नाही.
१ मिथ्यात्व कर्माची स्थिति कर्माचा क्षयोपशम होऊन अंतःकोटाकोटी स्थितिप्रमाण होणे यास क्षयोपशमलब्धि म्हणतात.
२ मिथ्यात्वकर्मांची स्थिति कमी झाल्यामुळे परिणामाची मंदकषायरूप विशुद्धि होणे यास विशुद्धिलब्धि म्हणतात.
३ स्थितिबंधापसरण-अनुभागबंधापसरणपूर्वकसम्यग्दर्शन प्राप्त होण्याची योग्यता प्राप्त होणे त्यास प्रायोग्यलब्धि म्हणतात.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org