________________
तत्त्वार्थसार अधिकार २ रा
सूक्ष्योपशान्त संक्षीणकषाया योग्ययोगिनौ । गुणस्थान विकल्पाः स्युरिति सर्वे चतुर्दश ॥ १७ ॥ अर्थ- १ मिथ्यादृष्टि २ सासादन ३ मिश्र ४ असंयत ५ देशसंयत ६ प्रमत्त विरत ७ अप्रमत्तविरत ८ अपूर्वकरण ९ अनिवृत्तिकरण १० सूक्ष्मसांपराय ११ उपशांत मोह १२ क्षीणमोह १३ सयोगकेवली १४ अयोगकेवली.याप्रमाणे गुणस्थान भेदाचे जीव १४ प्रकारचे आहेत.
मिथ्यादृष्टि गुणस्थान लक्षण मिथ्यादृष्टि वेज्जीवो मिथ्यादर्शनकर्मणः ।
उदयेन पदार्थानामश्रद्धानं हि यत्कृतं ॥ १८ ।।
अर्थ- मिथ्यात्वकर्माच्या उदयाने जीव-अजीवादि सात तत्त्वाविषयी जे विपरीत श्रद्धान त्यास मिथ्यात्व म्हणतात. मिथ्यात्व परिणामानेयुक्त जो जीव तो मिथ्यादृष्टि-अज्ञानी म्हटला जातो. सम्यग्दर्शन-आत्मस्वभावाचे दर्शन हा जीवाचा स्वाभाविक गुण आहे. ज्या कर्माच्या उदयात जीवाला आपल्या शुद्ध-ज्ञा दर्शन स्वभावाची जाणीव होत नाही आत्मदर्शन-आत्मानुभूति होत नाही. त्यास मिथ्यात्वदर्शन मोहकर्म म्हणतात. या मिथ्यात्वकर्माच्या उदयाने राग-द्वेषादि परभावाविषयी व परद्रव्याविषयी आत्मत्वबुद्धि, एकत्वाध्यास, उत्पन्न होतो. अतत्वाविषयी तत्वबुद्धी, अधर्माविषयी धर्मबुद्धि विपरीत मान्यता उत्पन्न होते या विपरीत मान्यतारूप मिथ्यात्व परिणामानेयुक्त जीवास मिथ्यादृष्टि म्हणतात
सासादन गुणस्थान मिथ्यात्वस्योदयाभावे जीवोऽनन्तानुबंधिनां ।
उदयेनास्तसम्यक्त्वः स्मृतः सासादनाभिधः ।। १९ ।।
अर्थ- मिथ्यात्वकर्माच्या उदयाचा अभाव असल्यामुळे अद्यापि मिथ्यादृष्टि झाला नाही परंतु अनंतानुबंधी, क्रोध, मान, माया, लोभ, यांच्या उदयाने जो सम्यग्दर्शनापासून च्युत झाला आहे, मिथ्यादृष्टि होण्यास सन्मुख आहे तो सासादन गुणस्थान नामक म्हटला जातो.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org