________________
तस्वार्थसार अधिकार २ रा
१ चक्षुदर्शन- चतुरिंद्रिय किंवा पंचेंद्रिय जीवाना जे चक्षुरिंद्रिय मतिज्ञान होते त्यापूर्वी जे दर्शन होते त्यास चक्षुदर्शन म्हणतात.
२ अचक्षुदर्शन- एकेंद्रियापासूस पंचेंद्रियापर्यंत सर्व जीवाना जे चक्षुशिवाय इतर स्पर्शनेंद्रियादि चार इंद्रियानी ज्ञान होते त्यापूर्वी जे दर्शन होते त्यास अचक्षुदर्शन म्हणतात.
३ अवधिदर्शन- अवधिज्ञानी जीवाला अवधिज्ञान होण्यापूर्वी जे दर्शन होते त्यास अवधिदर्शन म्हणतात.
४ केवलदर्शन- केवलज्ञानी जीवाना केवलज्ञानाबरोबर युगपत् जे दर्शन होते त्यास केवलदर्शन म्हणतात.
मिथ्यादृष्टि जीवाना कुमति-कुश्रुतज्ञान होण्यापूर्वी चक्षुदर्शन किंवा अचक्षुदर्शन होते. मिथ्यादृष्टि कुअवधिज्ञानी जीवाना कुअवधिज्ञान हे कुमति-कुश्रुत पूर्वक होते म्हणून त्याना अवधिदर्शन होत नाही.
- जीवाचे भेद संसारिणश्च मुक्ताश्च जीवास्तु द्विविधाः स्मृताः । लक्षणं तत्र मक्तानां उत्तरत्र प्रवक्ष्यते ।। १४ ।। सांप्रतं तु प्ररूप्यन्ते जीवाः संसारवर्तिनः ।
जीवस्थान गुणस्थान मार्गणादिषु तत्त्वतः ।। १५ ॥
अर्थ-जीवाचे दोन भेद आहेत. १ संसारी २ मुक्त. जे आठ कर्मानी रहित आहेत त्यांना मुक्त म्हणतात. त्यांचे स्वरूप पुढे विस्ताररूपाने सांगणार आहेत.
सांप्रत या ठिकाणी संसारीजीवाचे १४ जीवसमास १४ गुणस्थान १४ मार्गणाभेद रूपाने यथार्थ तात्विक प्ररूपण करतात.
१४ गुणस्थान भेद मिथ्यादृक सासनो मिश्रोऽसंयतो देशसंयतः ॥ प्रमत्त इतरोऽपूर्वानिवृत्तिकरणौ तथा ॥ १६ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org