________________
तत्त्वार्थसार अधिकार २ रा
प्रथम वस्तूचा सत्तामात्ररूप सामान्य प्रतिभास होतो नंतर विशेषाकाररूप. प्रतिभास होतो तसेच ज्ञानाला प्रथम ( अहं जानामि ) रूप स्व-प्रतिभास होतो नंतर पदार्थाचा प्रतिभास होतो. '
:
:I4
. प्रथम वस्तूचा सामान्य प्रतिभासस्वरूप दर्शन झाल्याशिवाय विशेष प्रतिभासस्वरूप ज्ञान होत नाही तसेच प्रथम स्वप्रतिभासस्वरूप दर्शन झाल्याशिवाय अर्थप्रतिभासस्वरूप ज्ञान होत नाही.
पदार्थाचे प्रथम ज्ञान होण्यापूर्वी, सामान्य प्रतिभासरूप किंवा स्व-प्रतिभास स्वरूप दर्शन होणे आवश्यक आहे. पण एकवेळा दर्शनपूर्वक ज्ञान, झाल्यानंतर ज्ञानाची परंपरा, जी काहीकालं अखंड प्रवाह रूपाने चालू असते त्यावेळी प्रत्येक ज्ञानाचेपूर्वी दर्शन होण्याची आवश्यकता राहात नाही. मतिज्ञानपूर्वक मतिज्ञान होते किंवा मतिज्ञानपूर्वक श्रुतज्ञान होते त्यावेळी प्रथम मतिज्ञानापूर्वी - जसे प्रथम दर्शन होणे आवश्यक असते तसे अखंड प्रवाहरूपाने होणा-या मतिज्ञ नापूर्वी किंवा श्रुतज्ञानापूर्वी पुनः दर्शन होण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे श्रुतज्ञानास वेगळे दर्शन सांगितले नाही... मनःपर्ययज्ञान देखील ईहामतिज्ञानपूर्वक प्रथम प्रेरणा उत्पन्न होते नंतर. मनःपर्य यज्ञान आत्मिक शक्तीने जाणते म्हणून मनःपर्य यज्ञानाचे पूर्वीदेखील. वेगळे दर्शन होत नाही.
ज्ञानोपयोग व दर्शनोपयोगाचे भेद ज्ञानमष्टविधं प्रोक्तं मतिज्ञानादि भेदतः । चक्षरादि विकल्पाच्च. दर्शनं स्याच्चविधं ॥ १३ ।।
. अर्थ-- ज्ञानोपयोगाचे आठ भेद आहेत...१ मतिज्ञान, २ श्रुतज्ञान, ३ अवधिज्ञान, ४ मनःपर्ययज्ञान, ५ केवलज्ञान (मिथ्यादृष्टिसंबंधी), .६ कुमतिज्ञान, ७ कुश्रुतज्ञान, ८ कुअवधिज्ञान
. दर्शनोपयोगाचे चार भेद आहेत. १. चक्षुदर्शन, २ अचक्षुदर्शन, .३ अवधिदर्शन, ४ के वलदर्शन.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org