________________
का ?
(१०) मला आता जी काही दु:खे भोगावी लागत आहेत ती सर्व माझ्या केलेल्या हिंसारूप कर्माचीच फळे आहेत.
क) जैनांच्या अहिंसेचे व्यावहारिक परिणाम
(१) अहिंसातत्त्वाचा दैनंदिन व्यवहारात सूक्ष्म वापर करत असताना, जैनांनी प्रथम स्वत:च्या आहारात पूर्ण अहिंसा आणली. शाकाहाराच्या अंतर्गतही प्रत्येक वनस्पतिजीवाचा सूक्ष्म विचार केला. 'ज्यांची जीवितशक्ती मुळात कमीत कमी आहे अशा वनस्पतिजीवांना साधारणशरीरी' म्हणतात. अशा वनस्पतींचा आहारात त्याग करावयास सांगितला. बटाटा, रताळी इ. कंद अनंतकायिक वनस्पती' असल्याने धार्मिक दृष्टीने कायमच वयं मानल्या आहेत. शाकाहाराचा अवलंब करतानाही त्यात अनेक नियम-उपनियम तयार केले.
(२) साधूंच्या प्रांतात शिरले की 'पिण्डैषणा' या ग्रंथात, साधूंच्या प्रासुक, एषणीय अशा आहारग्रहणाची विस्ताराने चर्चा केलेली दिसून येते. साधूने भिक्षा कशी घ्यावी, याचे अनेक नियम-उपनियम, प्रायश्चित्तविधी यांचे अतिशय सूक्ष्मतेने केलेली चिकित्सा आढळून येते.
पाच उदुंबर फळांचा म्हणजे वड-पिंपळ-उंबर या जातींच्या फळांचा त्याग सांगितला आहे. मद्य-मांस-मधुनवनीत म्हणजे लोणी, यांचाही त्याग करावयास सांगितला आहे. त्याकाळी मधमाशाचे पोळे जाळून मध मिळवीत असत. शिवाय ताकात तयार झालेले ताजे लोणी खातात पण लोणी बाहेर काढून, टिकवून खाण्याचा निषेध केलेल आहे. यामुळे 'अमूल बटर' निषिद्ध. पाणी गाळून, उकळून प्यायला सांगितले आहे. सारभाग कमी आणि तुच्छभाग जास्त अशी फळे उदा. सीताफळ, बोर खाण्याचा निषेध केला आहे.
(३) जैन स्त्री सिल्कच्या साड्या घालताना दिसत नाही. लेदर पर्सेस, बॅग्जचा वापर करताना दिसत नाही. घरात पाळीव प्राणी किंवा अॅक्वेरियम ठेवीत नाही. हिंसेवर आधारित असे पंधरा व्यवसाय निषिद्ध म्हणून सांगितले आहेत. खाटिक, मासेमारी, शिकार, रेशीम, हस्तिदंत इत्यादि प्रत्यक्ष हिंसाधार व्यवसायांमध्ये जैन व्यक्ती सहजी प्रवेश करीत नाही. पेस्ट-कंट्रोल करतानाही त्यांच्या मनात पापबंधाचेच विचार असतात.
(४) जैनांची अहिंसा ही हळूहळू नकारात्मकतेकडे वळली. अमूक व्यवसाय करायचे नाहीत ; अमूक वनस्पती-या भाज्या, ही फळे खायची नाहीत ; यांपासून दूर रहा ; यांचा त्याग करा - अशा प्रकारची नकारात्मकता वाढत गेली. उदाहरणार्थ सुग्रास संतुलित अन्नाचे ताट जर समोर आले तर 'अन्न हे पूर्णब्रह्म' मानून सामान्य व्यक्ती ‘वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे' म्हणून आनंदाने खायला लागेल. याउलट जैन धार्मिक व्यक्ती यात कांदा आहे का', लसूण आहे का' याची चिकित्सा करत बसेल आणि शंका-संशय घेऊन पापभावनेने ते अन्न खाऊ लागेल. शिवाय झाडे-प्राणी यांच्यापासून दूर गेल्यामुळे निरीक्षण थांबले. जागृकता उरलीच नाही. प्रवृत्ति आणि निवृत्तीतला तोल मात्र ढळला.
ड) गांधीजींचे जैनधर्म व जनतेस योगदान
'गांधीजींनी जैन तत्त्वांची उधार-उसनवारी केली की जैनधर्माला योगदान दिले', हे अभ्यासताना आपल्याला पं. सुखलालजी संघवी या अभ्यासकाचा परिचय करून घेतला पाहिजे. पं. सुखलालजी संघवी हे साधारणपणे गांधीजींना समकालीन, जैन धर्मात जन्मलेले, अहमदाबादनिवासी, पूर्णत: अंध व्यक्ती असूनही जैनधर्माचा तौलनिक अभ्यास करून ग्रंथनिर्मिती करणारे, गांधीवादी विचारांचा पगडा असलेले होते. आज जर जैनधर्माचे साक्षेपी आणि तौलनिक चिंतन करायचे असेल तर त्यांचे दर्शन और चिंतन' हे जणू बायबलच आहे. यात त्यांचा गांधीजी आणि जैनधर्म या दोहोंचे परस्परसाहचर्य सांगणारा लेख आहे. त्यांच्या लेखाचे शीर्षक आहे - 'गांधीजी की जैनधर्म को
देन'.