________________
ज्याअर्थी हाल सातवाहनाच्या काव्य-दरबारात ते अग्रगण्य होते, त्याअर्थी 'तरंगवईकहा' पादलिप्तांनी आधीच लिहिलेली असावी. त्यामुळेच ते सुप्रसिद्ध झाले होते. जैन प्रबंधग्रंथात दोघांच्या संदर्भातल्या पैठणला घडलेल्या दंतकथा नमूद केल्या आहेत. गाथासप्तशतीच्या रचनेसाठी गाथांचे संकलन, निवड - यामध्ये पादलिप्त नक्कीच सहभागी होते. गाथासप्तशतीत दोघांच्या सुमारे १५-१५ गाथा आहेत. त्या प्रत्येक ठिकाणी (त्या त्या शतकात) त्यांच्या गाथा शेजारी-शेजारी आलेल्या दिसतात. देशी अर्थात् संस्कृतोद्भव नसलेल्या शब्दांचा त्यांनी कोश (संग्रह) केला होता - अशी माहिती हेमचन्द्रकृत 'देशीनाममाले'च्या दुसऱ्या गाथेच्या टीकेत मिळते.
एकंदरीत महाराष्ट्रीतील पहिला काव्यग्रंथ (उपलब्ध नसला तरी अनेक पुराव्यांनी नक्की झालेला) पादलिप्त (पालित, पालित्त, पालित्तय) या जैन आचार्यांनी लिहिलेला होता असे दिसते.
(१०) मराठी-भाषकांना महाराष्ट्री आणि जैन महाराष्ट्री आकलनसुलभ :
'मराठी' आणि 'महाराष्ट्री'चा संबंध काही विद्वान अमान्य करीत असले तरी दुसऱ्या कोणत्याही भाषकांपेक्षा मराठीभाषक लोकांना महाराष्ट्रीच नव्हे तर कोणत्याही प्राकृत भाषा शिकणे अधिक सोपे जाते. ह्यावरून असेही सिद्ध होते की 'वैयाकरणांची सामान्य प्राकृत' म्हणजे महाराष्ट्रीच आहे.
जैन महाराष्ट्रीमध्ये लेखन केलेल्या जैन आचार्यांचे (प्राय: श्वेतांबर) मराठीला असलेले योगदान स्पष्ट करण्यासाठी उदाहरणादाखल शब्दांचा एक तक्ता दिला आहे. सर्व शब्द देशीनाममालेतून घेतले आहेत.
जैन महाराष्ट्री भाषेत आढळणारे मराठीशी साम्य असलेले 'देशी' शब्द १) उच्छल - उसळणे
२) उंदुर - उंदीर ३) ऊसअ - उशी
४) ओलुंड - ओलांडणे ५) कोड्ड - कोड, कोडकौतुक
६) खिडक्किया - खिडकी ७) राखिर - खिरणे
८) खुड्ड - खुडणे ९) खेड्ड - खेळणे
१०) घढ - गड ११) Vघुट्ट - घोट घेणे
१२) Vघुसल - घुसळणे १३) Vघोल - घोळणे
१४) ।चक्ख - चाखणे १५) चंग - चांगला
१६) चिच्चुप्प - चाचपणे १७) ।चड - चढणे
१८) चिक्खल्ल - चिखल १९) ।चुक्क - चुकणे
२०) Vचोप्पड - चोपडणे २१) छिव - शिवणे
२२) छोयर - छोकरा २३) जग्ग - जागणे
२४) जंभा - जांभई २५) जिम - जेवणे
२६) जुज्झ - झुंज, युद्ध २७) राजुप्प - जुंपणे
२८) Vझड - झडणे २९) झडप्प - झडप
३०) Vझर - झरणे ३१) डगल - ढेकूळ
३२) Vढुंढुल्ल - ढंढोल - धुंडाळणे ३३) तुप्प – तूप
३४) Vतोड - तोडणे ३५) Vदक्खव - दाखविणे
३६) दद्दर - दादर ३७) दाढिया - दाढी
३८) दाव - दावणे, दाखविणे ३९) दुब्भ - दुभती (गाय)
४०) देक्ख - देखणा ४१) पल्हत्थ - पालथा
४२) पाव - पावणे, प्राप्त करणे