________________
निबंधस्पर्धा वृत्तांत आणि स्पर्धकांचे अभिनंदन (जैन अध्यासन आणि सन्मतीच्या संयुक्त विद्यमाने)
डॉ. नलिनी जोशी ऑक्टोबर महिन्यात जैन अध्यासन आणि सन्मति-तीर्थच्या संयुक्त विद्यमाने निबंधस्पर्धा जाहीर करण्यात आली. सन्मति-तीर्थच्या शिक्षिकांनी ती स्पर्धा त्यांच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविली. पुण्यातील काही मंदिरे व स्थानके यातही पत्रक लावले गेले. 'जैन जागृति' मासिकात तत्संबंधी निवेदन देण्यात आले. या सर्वांचा परिणाम म्हणून निबंधस्पर्धेसाठी एकूण ३९ निबंध आले. निबंधाचा विषय होता : एक अजनबी को जैन धर्म से कैसे परिचित करें ?
: एका अनभिज्ञ व्यक्तीस जैन धर्माची ओळख कशी कराल ?
: Introduction of Jainism to a Layman पुणे आणि उपनगरातून सर्वात जास्त प्रतिसाद मिळाला. पुण्यातून डेक्कन जिमखाना, शिवाजीनगर, कोथरूड, मार्केटयार्ड, धनकवडी, बिबवेवाडी, कात्रज येथून निबंध आले. हडपसर, खडकी, चिंचवड आणि पिंपरीतूनही प्रतिसाद मिळाला. चिंचवडचा प्रतिसाद लक्षणीय होता. त्याखेरीज अहमदनगर, औरंगाबाद, सातारा, कोल्हापूर, सांगली, लोणी (ता.राहता), कडा (ता.आष्टी) आणि अंधेरी (मुंबई) येथून जो अनपेक्षित प्रतिसाद मिळाला त्याचे श्रेय 'जैन जागृति' मासिकाला द्यावे लागेल.
निबंधाच्या निमित्ताने जैन जनमानसाचा कानोसा घेता आला. नवीन परिभाषेत हा एक 'sample-socialsurvey' ठरला. 'आत्ताच्या जैन समाजाची आपल्या धर्माकडे बघण्याची दृष्टी कशी आहे ?'-ते या निमित्ताने
कळले.
___ 'अजनबी' किंवा 'अनभिज्ञ' या शब्दाचे खूप वेगवेगळे अर्थ स्पर्धकांनी लावले. त्यातील विविधता आणि प्रतिभा फारच लक्षणीय होती. काहींनी पाश्चात्य देशातल्या ख्रिश्चन धर्मीयांना जैन धर्म सांगितला. काहींनी हिंदुधर्मातले आपले मित्र किंवा मैत्रिणी निवडल्या. आपण स्वत: जैनधर्मीय असूनही 'अजनबी'च आहोत असे गृहीत धरून काहींनी साधु-साध्वींकडून प्रवचनातून माहिती घेतली. एका महिलेने आपल्याच १०-१२ वर्षाच्या स्मार्ट, तरतरीत मुलाशी संवाद साधला, तोही अतिशय सोप्या भाषेत. कोणी आपल्या शेजारच्या अ-जैन युवकांना आठवडाभर संध्याकाळी अर्धा तास जैन धर्मातली वैज्ञानिक तथ्ये समजावली. एका लेखिकेने असे रंगविले की ती दिवसभर आपल्या ब्राह्मण मैत्रिणीकडे गप्पा मारायला जाते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरात, बागेत जे जे प्रसंग घडतात ते ध्यानी घेऊन तिने वेळोवेळी उद्बोधन केलेले दिसले. एका लेखिकेने गांधी जयंती साजरी करणाऱ्या समूहाला जैनविद्या' या विषयाची सर्व अंगे समजावून सांगितली.
मुंबईच्या एका निबंधातील हस्ताक्षरावरून कळत होते की जुन्या मराठी वळणाचे हे हस्ताक्षर नक्की ८० वर्षाच्या घरातील गृहस्थाचे आहे. सांप्रत काळ ‘महावीरतीर्था'चा असल्याने त्यांनी महावीरांचे सुलभ चरित्र श्रोत्यांना सांगून अखेरीस जैन धर्माचा सोपा उपदेश त्यांच्या तोंडून समजावून सांगितला. क्लिष्ट, पारिभाषिक अशा सर्व संकल्पना टाळल्या. त्या प्रचलित बोलीभाषेत सांगितल्या.
आपल्या धर्माची ओळख करून देण्यासाठी कोणकोणते मुद्दे घेतले पाहिजेत याची चांगली जाण एकंदरीत बऱ्याच स्पर्धकांमध्ये दिसून आली. लोकसंकल्पना, कालचक्र, तीर्थंकर, षड्-द्रव्ये, नव-तत्त्वे, कर्मसिद्धांत, अनेकांतवाद, साधु-आचार, श्रावकाचार, १२ तपे, अनुप्रेक्षा, शाकाहार - यातील अनेक मुद्यांचा निबंधात समावेश केला गेला.
___ 'अनभिज्ञ' व्यक्ती तर्कशुद्ध विचार करणारी, जैन समाजाचे सामान्यतः निरीक्षण करणारी आणि परखड प्रश्न विचारणारी असू शकते. हे सर्व गृहीत धरून ज्यांनी अधिक चिकित्सकपणे प्रश्नोत्तररूपाने मांडणी केली ते प्रथम