________________
हे सर्व जाणून षट्जीवांविषयी आत्म्यौपम्य भाव ठेवावेत. त्यांचे भय वाढीला लागणार नाही यासाठी विलासितता फॅशन, हौस, कोणत्याही चिकित्सा हे सर्व करताना त्या जीवांविषयी करुणा ठेवावी.
(१८) सूत्रकृतांग (२) : काही विशेष व्यक्तिरेखा
ज्योत्स्ना मुथा सूत्रकृतांगाचा मुख्य विषय ‘स्वसमय' व 'परसमय' आहे. अहिंसा, अपरिग्रह, आहार, साधुचर्या, १८ पापस्थाने, क्रियास्थाने, प्रत्याख्यानाचे महत्त्व, गुरु-शिष्य संबंध, त्याग-विरति, समाधिमरण यांद्वारे 'स्वसिद्धांत' सांगितला आहे. तर बौद्ध, सांख्य, वैदिक, चार्वाक इ. दर्शने व पंचमहाभूतवाद, तज्जीवत्च्छरीरवाद, ईश्वरकारकिवाद व नियतिवाद इ. वादांचे ठिकठिकाणी उल्लेख करून ‘परसिद्धांत' दर्शविला आहे. या सर्वांचा एकत्रित परिचय होतो तो 'पुण्डरिक', 'आर्द्रकीय' व 'नालंदीय' या अध्ययनात आलेल्या संवादांद्वारे. त्यात उठून दिसणाऱ्या व्यक्तिरेखा म्हणजे 'गोशालक', 'आर्द्रक', 'गौतम' व 'पार्खापत्य पेढालपुत्र'.
१) गोशालक : सूत्रांत प्रत्यक्ष नामोल्लेख नाही. चूर्णिकार, टीकाकाराच्या आधारे तसेच भगवतीसूत्रातील १५ व्या शतकाच्या आधारे, गोशालक स्वत:ला महावीरांचा शिष्य समजतो. सतत त्यांच्या मागोमाग फिरत व तप करत मंखलीपुत्र गोशालक अनेक प्रश्नांनी महावीरांना भंडावून सोडतो. पुढे जाऊन स्वत:चाच स्वतंत्र ‘आजीवक' संप्रदाय स्थापन करून, महावीरांपेक्षा जास्त शिष्यसमुदाय जमवणारा, स्वत:लाच तीर्थंकर म्हणवणारा, आत्मप्रौढी असा गोशालक महावीरांच्या दर्शनाला निघालेल्या आर्द्रकाला मध्येच अडवून - ‘महावीर कसे दुटप्पी आचरण करणारे, डरपोक, वणिक, चंचलवृत्तीचे, लोकसमूहात वावरणारे', अशी भरपेट निंदा करतो. तो धाडसी व मत्सरी असून स्वत:च्याच साधूंचे सचित्तजल, बीजकाय, आधाकर्मी आहार, स्त्रीसेवन इ. आचाराचे छातीठोकपणे समर्थनही करतो. असा हा 'स्पष्टवक्ता' गोशालक.
२) आर्द्रक : गोशालकाच्या अगदी उलट की ज्याने महावीरांना अजून प्रत्यक्ष पाहिलेही नाही. अनार्य देशातला, केवळ जातिस्मरणामुळे प्रव्रज्या धारण केलेला, महावीरांच्या दर्शनाच्या अतीव ओढीने निघालेला, परंतु तरीही रस्त्यात भेटलेल्या गोशालकाच्या प्रत्येक आक्षेपाला मार्मिकपणे खोडून काढणारा असा आर्द्रक. यावरूनच त्याचा निग्रंथधर्मावर दृढ विश्वास दिसून येतो. 'वणिकाची उपमा एकदेशीय कशी सत्य आहे, कारण ते सर्वांचा आत्मिक लाभ पाहून उपदेश देतात, पण सर्वथा व्यापारी नाहीत' हेही पटवून देतो. यावरून रंगूनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा' या पद्याची आठवण करून देणारे असे महावीर होते, हे आर्द्रकाच्या विवेचनातून स्पष्ट होते. आर्द्रक बुद्धिमान व वाक्पटू होता. तो बुद्धाच्या आहाराची उपहासात्मक टीका करतो तर सलगी दाखवणाऱ्या सांख्यांना झटकून टाकतो. असा हा 'व्यवहारी' आर्द्रक.
३) गौतम, ४) पार्खापत्य पेढालपुत्र : हे दोघे दोन वेगवेगळ्या तीर्थंकरांच्या परंपरेतले. तरी सहज शंका विचारणारा पार्श्वनाथांच्या परंपरेतील पेढालपुत्र. त्याच्या मनात प्रत्याख्यानाविषयी गैरसमज आहे, अज्ञान आहे, अनभिज्ञता आहे. तरीही संकोच न करता पृच्छा करतो. 'गौतम' पूर्वाश्रमीचे प्रकांड पंडित तर आता भ. महावीरांचे प्रथम गणधर तरीही निराभिमानी. गौतमाने पेढालपुत्राला त्रस व त्रसभूत शब्दातील साधर्म्य दाखवून सुप्रत्याख्यानाचे दिग्दर्शन, विविध उदाहरणाद्वारे करविले. आभार न मानता, जाणाऱ्या पेढालपुत्राला आपल्या वकिली बुद्धीने, कृतज्ञता व्यक्त करण्यास भाग पाडले. पेढालपुत्रानेही आपण आधीच्या परंपरेतील असूनही आपली चूक मान्य करून, चातुर्यामधर्म सोडून, सप्रतिक्रमण पंचमहाव्रतात्मकधर्माचा अंगीकार केला. गौतमाने विनयपूर्वक महाशंकडून त्याला पंचमहाव्रतात्मक धर्म देऊन, श्रमणसंघात सम्मीलित केले. यावरून उदकपेढालपुत्राची सत्य जाणण्याची व पचविण्याची वृत्ती तर गौतम हे 'विद्याविनयेन शोभते'चे प्रतीक.
उपसंहार : वरील व्यक्तिरेखांमुळे सूत्रकृतांगातील मुख्य विषयाला पुष्टी मिळते. जसे एखाद्या चित्रपटात जर