________________
मनात येतो.
वर उल्लेखिलेला अनेकान्तवाद कोणी व कसा आचरणात आणायचा हा आजच्या काळातील मोठा यक्षप्रश्न आहे. दोन व्यक्ती अथवा दोन पक्ष समोरासमोर आल्यावर, वैचारिक उदारता प्रथम कोणी दाखवायची व कोण कोणाचे ऐकून घेणार आहे हा प्रश्नच आहे. उलटपक्षी जो कोणी प्रथम नमते घेईल, त्याला भित्रा, बुळा असेही संबोधले जाईल. त्यामुळे अनेकान्तवाद सामान्य व्यक्तीच्या आटोक्याबाहेरचा आहे असे वाटते. याउलट ज्यांच्याध्ये तात्त्विक विचारांची बैठक आहे, आत्मौपम्य बुद्धी आहे व सहनशीलता आहे, अशी विवेकी मंडळीच त्याचे आचरण करू शकतील, त्याचा विचार करू शकतील असेही वाटू लागते. ___वाणीसंयमाचे महत्त्व तर महावीरांनी अनेक उपदेशातून पटवून दिले आहे. जिभेवर ताबा असेल तरच साधूचे अस्तित्व टिकून राहते. त्याची जनमानसातील प्रतिमा उंचावते. नाहीतर ती रसातळाला जावयास वेळ लागत नाही. त्याचबरोबर वाणीचा संबंध हिंसेशी असल्याने पापमय प्रवृत्तींना उत्तेजन देणाऱ्या भाषेचा वापर टाळावा लागतो. तसेच निश्चयात्मक, हेकेखोर, आक्रमक, एकांगी बोलणे टाळावे लागते. हे जरी सगळे खरे असले तरी समाजातील वाई प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी, साधूंना, वेळप्रसंगी प्रवचनातून दोन खडे बोलही सुनवावे लागतात, नव्हे ते त्यांचे कर्तव्य ठरते, हे आपण पाहतो.
चे महत्त्व पदोपदी जाणवते. वर्तमानपत्रातून येणारी उच्चपदस्थांची बेजबाबदार वक्तव्ये देशाची प्रतिमा मलिन करताना दिसतात. तसेच अनेक तथाकथित लोकमान्य संतांचे अशोभनीय आचरण शरमेने मान खाली घालावयास लावते.
थोडक्यात, साधूंची समाजाकडे पाहण्याची दृष्टी कशी असावी, त्यांचा वाणीसंयम कसा महत्त्वाचा आहे, त्याचबरोबर त्यांची विधाने द्रव्य, क्षेत्र, काल, भाव लक्षात ठेवून अनेकान्तवादाने केलेली असावीत, त्याला निश्चयनयाबरोबर व्यवहारनयाचीही जोड असावी या गोष्टी या अध्ययनात अधोरेखित केलेल्या दिसतात. तसेच हा उपदेश जनसामान्यांकरिताही तेवढाच महत्त्वपूर्ण आहे, याचीही प्रकर्षाने जाणीव होते. अर्थात् सर्वच गोष्टींना मर्यादा असतात, हेही विसरून चालणार नाही.
तरीसुद्धा ‘अनेकान्तवाद' हे महावीरांचे जैन धर्माला दिलेले मोठे योगदान ठरते, यात शंकाच नाही.
**********
(११) सूत्रकृतांगाचे दोन श्रुतस्कंध : तौलनिक विचार
रेखा छाजेड प्रस्तावना :
भ. महावीरांच्या पूर्वीचे तसेच भ. महावीरकालीन भारतातील सर्व दर्शनांचा विचार जर कोणत्या एकाच ग्रंथातून जाणून घ्यायचा असेल तर तो 'सूत्रकृतांगा'तून घेता येईल. जैन परंपरेने मांडलेला विचार आणि आचाराचा सुंदर समन्वय येथे आहे. हा वैचारिक ग्रंथ आहे. याची भाषा प्राकृत असून सर्वजनहितकारी आहे. अर्धमागधी भोप्या हा प्राचीन नमुना आहे. अंगसूत्रात याचे दुसरे स्थान आहे.
तुलना:
प्रथम श्रुतस्कंधाचा बराचसा भाग पद्यमय आहे. यामध्ये १६ अध्ययने असून काहींना उद्देशक आहेत. १६ पैकी ७ अध्ययनांची सुरवात प्रश्नोत्तराने होते. फक्त १६ वे अध्ययन गद्यमय आहे. तर दुसराश्रुतस्कंध मुख्यत: गद्यमय आहे. यात ७ अध्ययने असून, उद्देशक नाहीत. दोन्ही श्रुतस्कंधात तत्त्वज्ञानाला आचारधर्माची सुंदर जोड दिलेली आहे. स्वमत-परमताच्या रूपात जैन आणि जैनेतर (दार्शनिक) अशा दोन्ही परंपरांच्या मतांचा उल्लेख आहे. दोन्हीत त्या काळच्या दर्शनांची चर्चा ; जैनांची जीव-अजीव इ. ९ तत्त्वे ; तसेच अनेक परमतांचे विवेचन असून स्वमताचे माहात्म्य वर्णन केले आहे. जीवन व्यवहाराचा उच्च आदर्श सांगितला आहे.