________________
ऐतिहासिक लेख No.87
Arba 1188 हु. रो. रू न० ११०
राजमंडल स्वारी रांजश्री पंत प्रधान सु। समान सबैन माहे सबान तारीख २८ रोज माद्रपद वद्य नामावास्या सौम्यवार शके १६६९ हेमलंबी नाम संवत्सरे मु।। माची किले पुरंधर,
___ दफाते पत्रे. संस्थान वासदे येथील उदेसिंग मृत्यु पावला सबब संस्थानची जप्ती गणेश विश्वनाथ यागी केली आहे त्यास भगवान दयालजी यांस उदेसिंगचे स्त्रीने वीरसिंग यास दत्त पुत्र घेतला आहे त्याची संस्थानावर स्थापना करावी म्दणोन बिनती केली त्याज वरुन याज वर नजर देऊन सरकारचे नजरेचा ऐवज दाहा हजार एक रुपाया करार करुन त्या पैकी पांच हजार एक रुपये नीशा साहुकारी येथे बाशर्त ठाणे याची घेतली आहे बाकी पांच हजार राहिले हे ब सालाबादचे चौथाईचा ऐवज येण त्यास साल मजकूरी वसुल पडला असेल त्यांत माहाल मजकर सिबंदीचे ऐवज वजा करून बाकी राहील तो सदरहू ऐवजांत मजरा देऊन बाकी ऐवजाची नीशा करून घेऊन ठाणे वीरसिंगाचे हवाली करावे असा कगर केला असे व माल मजकूरचे ऐवजाची रुजवात तुमचे विद्यमाने गणेश विश्वनाथ याजकडील कारकूनाने करुन द्यावी रुजूवात होऊन वाकी राहीला ऐवज तो सदरहू काररांत वजा देऊन बाकी राहिले ऐवजाची नीशा तुमची झाली म्हणजे ठाणे तुमचे विद्यमाने वीरसिंगाचे हवाली करावे म्हणोन गोश विश्वनाथ यांस श्रालाहिदा पत्र सादर केले आहे तरी सदरहू लिहील्या प्रामाण करून ऐवजाची नीशा घेऊन ठाण हवाली करणे वजाच्या हुंछा करुन हुजूर पाठऊन भरणा करून जावघेणे पुढे दरसाल चौथाईचा ऐवज येणे त्याचा बन्दोबस्त पक्का करून घेऊन हुजूर लेहून पाठविणे भगवान दयालजीस बलसाडचे मुकामी लुटले आहे त्यास मगरबी जमातदार यांजकडे याची चीज वस्त गेली आहे त्याचा पत्ता लाऊन देवणे म्हणोन गजा राम खन्डेराव दीमत सखाराम भगवंत यांचे नांवे
सनद येविसी
सनदा २ १ सदरहू अन्वये गणेश विश्वनाथ यासकी राजाराम स्वन्डेराव यांस आज्ञा केली आहे. यास तुम्ही कारकून संस्थान मजकुरी ठेविला असेल त्यास लिहून साल मजरकूचे वसुलाची रुजूवात करून देणे त्याची नीशा
___ऐवजाची झाली म्हणजे तुम्हास लिहातील मग ठाणे मशारनिलेचे विद्यमाने वीरसिंगाचे हवाली करुन पावली याचे कवजा घेगे राजाराम खन्डेराव याचे वि॥ रुजूवात करणे म्हणोन तुम्ही आपले कारकूनास लिहून पावणे म्हणोन
१ वीरसिंग राजे सं.। वासदे यांसकी तुमची स्थापना संस्थान मजकूरा पर भगवान दयालजी यांचे मारफतीने केली आहे तरी याज पासून दीवाणगिरीचे काम काज घेऊन करार प्रा। नजरेचा ऐवजाचा भरणा सरकारांत करणे आणी जाब घेणे म्हणोन
3---तीन सनदा साननी याची
मा. श्री.
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com