________________
ससम फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. श्री व्यास महारानांनी आठरा पुराणांचे सार सांगतानां पुढील उद्गार काढले आहेत.
अष्टादश पुराणानां व्यासस्य वचनद्वयम् । परोपकाराय पुण्याय, पापाय परपीडनम् ।।
परोपकारासारखें पुण्य नाही व परपीडेसारखें पाप नाहीं थावरून काय बोध घ्यावयाचा?
प्राण्यास त्याचा जीव किती प्रिय असतो हे आपण पाहूं. एक वृद्ध झालेली ८० वर्षांची झातारी मृत्युचे आधीन लवकरच होणारी, व्याधीने पिडलेली व जिवास कंटाळून त्रस्त झालली बाजेवर स्वस्थ पडून राहिली असतांना अकस्मात वरून एक मोठा कृष्णसर्प तिच्या डोक्यावर पडला तर ती अंगांत शक्ति नसतांना अवसान आणून एकदम त्या बाजेवरून प्राणरक्षण करण्यासाठी उडी मारून बाजूवर पडेल. याचे कारण आत्मरक्षण हे होय ! मरण फिती अप्रिय आहे हे यावरून उघड दिसतच आह. या संबंधी श्री महाभारत अनुशासन पर्वामध्ये. उल्लेख केला आहे तो असा:
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com