________________
प्रम में निदाप पक्षी झाडावर बसून मधूर गायन करीत असताना त्यामगोगनें अगर गलोलीने दगड मारून जमिनीवर पाडतात त्यावेका ते पंख उडवून अत्यंत वान होऊन तडफडत प्राण सोडतात; परंतु दगडासारख्या कठीण अंतःकरणाच्या मनुष्यास दया कोठून असणार? ह्या वितभर पोटाकरितां निप, अवाचक, गरीब, परोपकारी प्राण्यांचा जाव घेतान्नं तुमचे वज्रासारखें कठीण हात मागें होऊ नयेत हे किती आश्चर्य आहे बरे ?
आपल्या धर्मशास्त्रांत लिहिले आहे की, सर्व प्राणीमावास साचा आत्मा प्रिय आहे ह्मणून त्याची हिंसा करूं नका. महा भारतांत अनुशासन पर्वात असें झटले आहे की,
प्राणदानात्परं दानं न भूतं न भविष्यति । नद्यात्मनः प्रियतरं किंचिदस्तो ह निश्चितम् ॥
प्रागदानापेक्षा दुसरें श्रेष्ट दान कोणतें ही नाही. कारण या लोकी आत्म्यापेक्षा दुसरी कोणतीही गोष्ट अधिक प्रियकर नाही. ह्यगून अभयदानासारखे दुसरे मोठे पुण्यच नाही. या संबंधाने येथे एका ऐतिहासिक गोष्टाचे टाचण करणे वावगें होणार नाही. ह्मणून ते येथे देतो.
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com