________________
( ६ )
रोजचा क्रम असल्यामुळे दयेचा अंकूर उत्पन्न होणे शक्यच नाहीं. यामुळे त्यांच्या ओरड्याकडे दुर्लक्ष होणे स्वाभाविक आहे. याच्या उलट मनुष्य प्राण्याची गोष्ट आहे. पहा जर कोणी इसम एखाद्या इसमाचा खून करीत असेल तर तो ओरडून आपल्या रक्षणासाठी लोकांस पाचारण करील व आपला बचाव करून घेईल. कारण त्यास वाचाशक्ति आहे हे होय! परंतु अवाचक प्राण्यांची कोणास दया न येऊन केवळ मांसाहाराच्या लालवीने कठोर अंतःकरणाचीं मनुष्ये त्यांच्या गळ्यावर सुरी चालवून वध करीत आहेत. प्राण जाण्याचे वेळी अत्यंत वेदना भोगून हाय हाय करून प्राण सोडतात व प्राण सोडण्याचे वेळीं असे दर्शवितात कीं, हे अधम पापी मनुष्या तुझे हाल माझ्या प्रमाणेच होवो! चारा खाऊन आह्मी मांसाची वृद्धि करीत असतांना कातडी सोलून आमचें मांस खाऊन आपलें मांस वृद्धिंगत करितां हे केवढे आश्चर्य आहे बरें ? या संबंधी एका कवीचं काय हणणे आहे तें पाहूं.
घांस खा मांस धावे ताकी उतरे खाल । मांस खाके मांस धावे ताका कोण हवाल ॥
तेव्हां या गोष्टीचा विचार करावयास नको काय ? त्याच
www.umaragyanbhandar.com
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat