________________
(४)
मुळे त्याची समजशक्ति वृद्धिंगत होऊ शकत नाही. शिवाय त्यांना जी समजशाक्त असते तिचा उपयोग केवळ शरीरपोषण व येणान्या संकटापासून रक्षण करण्यापलीकडे काही एक करणे शक्य नसते! पहा की, कित्येक वेळां कोल्हा, मांजर, कावळा, उंदीर हे प्राणी आपणांस कावेबाजपणाने कसे फसवीत असतात ? याचे दाखले वारंवार पहावयास मिळतात. त्याचे मुख्य कारण त्यांच्यामध्ये असलेली समजशक्ति हीच होय; परंतु वाचा नसल्यामुळे शरीराचे रक्षण व पोषण करण्यास लागणाऱ्या अकले पेक्षा जास्त अक्कल चालत नाही. यामुळे आपणांस वाटते की त्याच्यामध्ये तर्कशक्ति काही एक नाही.
आतां जनावरांमध्ये समजशक्ति नाही तर मग त्यांनां मरणाचे भय, दुःख, त्रास वगैरे वाटत नाही काय? अगर एखाद्या जनावरास लांकडाने मारले असतां वेदना होत नाहीत काय ? होतात. परंतु वाचाशक्तीच्या अभावामुळे त्यास सांगता येत नाही. त. नुसता बंदुकीचा आवाज ऐकल्यावरोवर पक्षी एकत्र जमून ओरडून ओरडून इकडे तिकडे पळत असताना आपण पहात नाही काय? इतकेच नाही तर मांजर रस्तान जात .. असेल तर पक्षी आपल्या ओरडण्याने दुसऱ्या पक्ष्यास
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com