________________
( २ )
अवश्यकता आहे तो पदार्थ ( लाइमखार ) ही यापासून मिळून हाडास मजबुती आणतो.
आपला मुख्य व अवश्य असा खुराक अन्न - वनस्पतिजन्य - च आहे. जसें निरनिराळ्या प्रकारचें धान्य, भाजीपाला व फळ फळावळ. पौष्टिक पदार्थात दुध व त्या पासून होणारें दही, म लाई, तूप, ताक हीं होत. शरीरांस पोषण करून बळकटी आणणारें सत्व त्यांत असतांना सुद्धां या देशांतील कांहीं लोक जसें क्षत्रिय, कोळी, वाघरी, रजपूत वगैरे हिंदु, मुसलमान, पारसी, ख्रिस्ती व अन्य जातीचे लोक मांस खातात.
धर्मशास्त्रदृष्ट्या विचार केला तर कोणत्याच धर्मांत धर्माच्या नांवानें हिंसा करण्याची अगर मांस खाण्याची आज्ञा नसतां - ना सुद्धां केवळ अज्ञानपणानेंच ही घातकी चाल चालत आली आहे. असें ह्मणणें गैर होणार नाहीं. या संबंधान किशेष विचार करतांना असें अनुमान निघतें कीं, ज्यावेळी भयंकर दुष्काळ पडून अथवा भयंकर रण माजून अन्नाचा तुटवडा पडत असेल व त्या वेळी केवळ प्राणरक्षणासाठी मांस खाण्यांत आले असेल व तीच रुडि पुढें अमलांत येऊन जास्त प्रमाणाने प्रचारांत आलेली असावा ! कारण नुसत्या मांसावरच मनुष्याचें जीवन
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com