________________
mummm एक भाग्यवान व्यापारी .....(२९)
-सुवचनें.:
" मुलांच्याकरतां से सांठवणे अगर इस्टेट, ठेव, करून ठेवणे त्यांना नापसंत. त्यांना 'ज्ञानदान' करणे, त्यांना शिक्षणसंपत्ति देणे, स्वतांस मिळवून खाता येईल, असे त्यांना तयार करणे, हे आईबापांचें पहिले कर्तव्य. मुले स्वार्जनी होण्यासाठी, त्यांना संस्कारित केले पाहिजे, व त्यासाठी त्यांना प्रथम 'ज्ञानी' केले पाहिजे."
___" कपडा व धान्य यांचे दान करणे मला अधिक आवडतें ! परंतु, त्याहिपेक्षां विद्यादान, ज्ञानदान करणे, मला जास्त आवडतें !"
___ "मुलगा आणि दुकानांतील नोकर यांचा दर्जा, मी, समानसारखाच समजतो. मुलाने दिवाळी केली, तर घांट्यानेहि ( नोकरानेहि ) पण, दिवाळी साजरी केली पाहिजे !"
___" कादंबरी-उपन्यास-यांची मला मुळीच आवड नाहीं !"
" लोक, मंदिर मसजिद चर्चमध्ये जातात, आणि बाहेरच्या जगांत, किंवा आचरणांत खोटे बोलतात. ही गोष्ट मला मुळीच पसंत नाहीं ! तसें विरुद्ध आचरण करणे म्हणजे माझ्या मते, ते एक अगदी धार्मिक झूट किंवा धार्मिक असत्याचरणच आहे; तें मला संमत नाहीं !"
*
"पैशाकरतां दुसऱ्यापुढे नाक घासण्याची पाळी, स्वतःवर कधी
येऊ देऊ नका." Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com