________________
.३०.... एक भाग्यवान व्यापारी www.ar ★ सामुद्रिक-शास्त्रदृष्टया, भाग्य-चिकित्सा ★ भाग्यवंत व्यापारी होण्यास, त्या व्यक्तिच्या उजव्या तळ
हातांत उत्कृष्ट भाग्य-रेषा, आणि त्या भाग्यरेषेच्या जोडीस उत्कृष्ट रविरेषा, तसेंच उत्कृष्ट बुधेरषा, या असाव्या लागतात. हात व हातांची बोटें चौरस आणि मस्तकोषाहि उत्कृष्ट असेल, तर, त्या तशा व्यक्तीस, त्या व्यक्तिच्या आयुष्यांत 'संपत्ति, कीर्ति, व आरोग्य,' यांचा मोठा लाभ निश्चितपणे होत असतो. श्री हरगोविंददास रामजी यांचे, चित्रांतील दोन्ही हात पहावे. भाग्यरेषेच्या मराठी २ या आवृत्तींत आम्ही त्यांचा डावा हात प्रामुख्याने दिलेला होता. डाव्या हातास महत्त्व देण्याचे [ नवीन ] मुख्य कारण असे आहे की, पुरुषांचे हात पाहतांना, उजवा हातच पाहण्याची पद्धति रूढ आहे. परंतु, आमच्या संशोधनाने आम्हांस असे आढळून आले आहे की, विशेषतः गुजराथी लोकांत, त्यांच्या पिढ्यानपिढया शोधून पाहिल्या, तर, त्यांच्यांत त्यांच्या उजव्या हातास, फार कमी महत्व आहे. कला-कौशल्य, उत्कृष्ट लेखन, बहुतेक सर्व क्रिया, उजव्या हातापेक्षां, डाव्या हातानेच जास्त होत असतात गुर्जर-बंधु-भगिनी सोडून, अन्य प्रांतीय अगर अन्य जातीय व्यक्तिकडून उजव्याच हाताला प्रामुख्याने कार्य करावयास लागून, शेकडा ४५ टक्के किंवा त्याच्याहूनहि कमी क्रिया, फक्त डाव्या हाताच्या चालत असतात. त्यामुळे गुजराथी लोकांत, डाव्या हातातील बहुतेक सर्व रेषा, उजव्या हातांतील रेषापेक्षा अधिक उठावदार व सुरेख, प्रायः आढळून येतात.
" गरुडाच्या दृष्टिप्रमाणे खया व्यापायाची दृष्टि पाहिजे ! त्याला
व्यापाराचे स्थान, लंकेतील सीतेप्रमाणे दुरूनहि दिसलें पाहिजे !" Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com