________________
mmmmm. एक भाग्यवान व्यापारी ......
त्यांच्या शत्रूने एकदा त्यांच्यावर फिर्याद केली होती; दोघेहि कोर्टात गेले ! कोर्टात गेल्यावर एका बाकावर शत्रू निद्रासुराचे आख्यान लावून बसला. परिस्थिति अशी होती की, झोपेत जर तो शत्रू इकडचा तिकडे वळला असता, तर फरशीवर आपटून त्याचे डोके व सर्वांग सडकले असते; परंतु तो पडत असतांना त्याला सावरून धरून त्यांनी उठविले. तेव्हां ते म्हणाले, "तुला माझ्याबद्दल द्वेष असला आणि तूं कोर्टात आलेला असलास, तरी तुझ्याबद्दल माझ्या अतंःकरणांत थोडाहि द्वेष नाही! तुझा मी अधःपात होऊ देणार नाही. परमेश्वरा? माझे कोणी शत्रु असल्यास माझ्या शत्रूच्या अंतःकरणांत सद्बुद्धि दे!" अशीच ते नित्य प्रार्थना करून झोपतात. 'निद्रा मला गाढपणे मिळाली पाहिजे, आणि झोपतांना जगांत शत्रु ठेवून अगर राखून झोपावयाचें नाही,' असा एक त्यांचा नियम आहे. त्यांच्या या सद्वृत्तिने अनेक हितशत्रूनी त्यांची संपूर्ण माफी मागितलेली आहे. ___ इंद्रियांवर, मनावर, हुकमत कशी गाजवता येईल, त्यांना आपल्या नौकरांच्याप्रमाणे कसे वागवतां येईल, याचाच आपण अहोरात्र व सर्वत्र विचार करीत असतो, असे त्यांचे म्हणणे अहि. इंद्रियें व मन ही आपली नोकर नसून ती सर्व आपल मालक झालेले आहेत, आणि आपण त्यांच्या ताब्यांत आहों, ही वाईट गोष्ट आहे, असे त्यांना वाटते.
श्रीहरगोविंद दासजी यांचे हे चरित्र जरी अल्प असले तरी • "भाग्याचिया भडसे (पुराने )। उद्यमाचेनि मिषे । समृद्धिजात ( सर्व
प्रकारची संपत्ति). आपैसे । घर रिघे (घरांत येईल)."-श्रीज्ञानेश्वर Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com