________________
..२६.mmm. एक भाग्यवान व्यापारी www.er चळवळ केली. पण सटीच्या बळापढ़ें शेवटी त्यांचे काही चाललें नाहीं. रूढीचा विजय झाला, आणि आपण पूर्ण हरलों, असेंते प्रांजलपणे कबूल करतात.श्रीहरगोविंद दासजींचे म्हणणे, "महावीर, भगवान श्रीकृष्ण अशासारख्यांच्या कडून सुद्धा जिथे सुधारणा घडू शकली नाही, रूढीचा त्यांनाहि पाडाव करतां आला नाही, तेथे माझ्या सारख्या सामान्य मनुष्याला आपल्याकडून सुधारणा घडवून आणणे, अगदी अशक्य! म्हणून आपण सुधारणेचा नाद सोडून दिला!" ।
जैनधर्माच्या आज्ञेनुसार त्यांनी गिरनार, अबू , शत्रुजय, तारंगा, समेतशिखर, राणकपूर, पावापुरीतीर्थ, राजगृही केसरीया जगडीया इत्यादि पवित्र स्थळांची यात्रा करून आपल्या मनाला पुष्कळ समाधान मिळविले. जंगलांत व पहाडांवर आपण निश्चयाकरतां जातो, एकांतसुखाचा लाभ मिळवून ज्ञान उपलब्ध करून घेण्यासाठी जातो, तशाच ठिकाणी विचारांना योग्य दिशा मिळते, असेंच त्यांना वाटते.
संसारकार्यातून निवृत्ति मिळविण्यासाठी त्यांनी आपल्या इस्टेटीचें वुइल पत्र करून त्यांत ३ मुलांना व एका मुलीला समान हक्कांची वांटणी करून दिली आहे. समभाव, त्याग, आसक्तिरहित होणे, काम क्रोध लोभ मोह यांचा पगडा चालू न देण्याचे सामर्थ्य, हीच माझी फार मोठी इस्टेट, ती तुम्हांस देत आहे, असा ते आपल्या मुलांमुलींना उपदेश म्हणून करतात व त्यांना तो आचरणांत आणावयास लावतात.
" वधूकरतां ज्याप्रमाणे नवरा किंवा वर शोधायचा, अगदी त्याचप्रमाणे
व्यापा-यानेंहि केले पाहिजे; त्यांत माळस मज्ञान उपयोगी नाही." Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com