________________
mmmmm एक भाग्यवान व्यापारी ...(२५). ___ आईवर त्यांचे अत्यंतिक प्रेम. आईच्या आज्ञेकरतांच त्यांनी आपले लग्न लौकर केलें. आईला श्रम नकोत, विश्रांति पाहिजे, आईला आपण सुख दिले पाहिजे, अशी त्यांची उच्च विचारसरणी होती. आणि त्यासाठी रोज रात्री थोडा वेळ तरी मातेचे पाय चुरल्याशिवाय श्रीहरगोविंद दासजींनी रात्र घालविली नाही. सतत ५ वर्षेपर्यंत आईकडून त्यांनी गोरगरीब साधुसजन, जातीय लोक, यांच्याकरितां तांदूळ गहूं यांचें लयलूट दानधर्मकार्य करून घेतले.
सतत, चालतां-बोलतां, व्यवहार करतां, जेव्हा जेव्हां म्हणून थोडाहि वेळ सांपडेल, त्या त्या वेळी, ॐकाराचा जप करावयाचा,-चालू ठेवावयाचा, असा त्यांचा अखंड नियम चालू आहे. मुलुंडला १९२० ते १९३० अखेर अनेक विद्वानांची, महान साधुसजनांची, दर रविवारी बैठक होत असे. ज्योतिषशास्त्र रमलशास्त्र यांचें उत्कृष्ट अध्ययन त्यांनी अशाकरतांच केलें, की, गोरगरीबांना त्यांचा वेळी अवेळी फायदा व्हावा. अतिशय श्रम करून मोफत कुंडल्या तयार करून देणे, शुभ कार्याना मुहूर्त काढून देणे, या गोष्टी एक पैसा न घेतां केवळ कर्तव्य म्हणूनच ते करीत असतात. अनेक मोठमोठ्या पंडितांचे व साधुजनांचे त्यांच्यावर अत्यंतिक प्रेम आहे. __ समाजांतील पडदापद्धति किंवा तोंडावर पदर-बुरखा बायकांनी घेणे ही रूढी मोडली जावी म्हणून, त्यांनी पुष्कळ
“ God is making commerce
his missionary.” Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com