________________
..२४.2mm एक भाग्यवान् व्यापारी www.m पादत्राणांचा त्यांनी त्याग करून दाखविला. २० वर्षेपर्यंत नित्य सडोचा व्यायाम, कसरत, दंड-बैठका कमीतकमी १०५ काढल्याशिवाय, त्यांनी एकही दिवस जाऊ दिला नाही.
बनारसला ३ वर्षे जो त्यांनी अभ्यास केला, त्यावेळी त्यांच्या बरोबर अभ्यासास एक साधुहि असे. त्याचाहि प्रभाव श्रीहरगोविंद दासजींवर झालेला आहे. लहानपणापासून, वयाच्या १६ व्या वर्षापासूनच, तपस्येचा पाठ त्यांनी आपल्या आयुष्यात घेतला. गरम पाणीच प्यावयाचं, तर, तो क्रम ३।३ वर्षे त्यांनी चालवून दाखविलेला आहे. उपवास करावयाचा, देवपूजा करावयाची, मंदिरांत जावयाचे आणि सर्रास झूट-खोटें, बोलत आणि वागत सुटावयाचे, हे त्यांना मुळींच मान्य नाही.
जिवंत माणसांचीच चरित्र वाचण्याची त्यांना अतिशय आवड आहे. मृतव्यक्तिची लिहिलेली चरित्रे वाचण्यास ते केव्हांहि राजी नसतात; त्यांचे म्हणणे जिवंत माणसांची चरित्रे वाचलीं, म्हणजेच आपणहि जिवंत राहूं! मृत व्यक्तिचीपश्चात् प्रसिद्ध झालेली चरित्रे ही काल्पनिक, बनावट, फार असतात; म्हणूनच बनावट चरित्रं, कादंबया, रहस्यकथा यांचा श्री हरगोविंद दासजींना तिटकारा आहे ! Self-Help मराठी 'सुख आणि शांति', अद्वैताश्रमाची भगवद्गीता, टागोरचरित्र, सर राधाकृष्णन् यांची चरित्रे, म. गांधींचे ग्रंथ, ब्रह्मचर्यासंबंधीची पुस्तकें, अशा वाचनाचा त्यांना फार नाद आहे. "वू दुकानाला सांभाळ, म्हणजे दुकानहि तुला सांभाळील,
प्रतिपाळील!" Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com