________________
wwwmn एक भाग्यवान् व्यापारी .( २३ )
वस्त्रदान अशा पद्धतीने करण्याचा प्रघात त्यांनी स्वतः पाडला, की, " स्वतःला ३० रुपयांचा एक कोट करावयाचा हेतु असला, तर, गरीबांच्या तळमळीने, त्यांनी ३० रुपयांत, ३ कोट बनवावयाचे व दोन कोट लोकांना देऊन, त्यांपैकी आपण 'एकच' कोट वापरावयाचा !"
गृहस्थाश्रम आदर्शवत करणे हीच त्यांची महत्वाकांक्षा बनलेली आहे. स्वतः आदर्श झाल्यावांचून आपले कुटुंब आदर्श होणार नाही, या नियमानेच त्यांनी आपली घरची वागणूक सतत ठेविलेली आहे. मंदिरांत. मशिदीत, चर्चमध्ये जाऊन, आपल्या पापाचा पाढा तेवढा वाचावयाचा आणि चुकलों म्हणून 'परमेश्वराजवळ क्षमा-याचना' करावयाची, ही गोष्ट सत्याला धरून नाही. त्या साठी देवळांतील जें वर्तन,वागणे, जे परमेश्वराजवळ, देवाजवळ नेहमी बोलणे, तेंच देऊळ सोडल्यानंतर, दुकानांत, व बाकीच्या जगाच्या व्यवहारांतहि ठेवावयाचे हाच त्यांचा मोठा आदर्श होय. दुकानांतहि पण सत्यच वागावयाचे, दंभ करावयाचा नाही, यांवर श्रीहरगोविंद दासजी यांचा फार कटाक्ष आहे.
संसारी-जीवनांतहि तपश्चर्या करून जगतां येते, हे त्यांनी समाजाला आपल्या कृतीने दाखविलेले आहे. कुटुंबांतील, नात्यांतील. लहान मोठ्या मुलांनी उंची उंची तेलें वापरली, तरी आजपर्यंत श्रीहरगोविंद दासजीनी आपल्या मस्तकास, तेलाच्या थेंबाचा स्पर्शहि होऊ दिलेला नाही! संपूर्ण बारा वर्षे
" व्यापायाची नीतिमत्ता कधीहि
चांचेगिरीची असता कामा नये." Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com