________________
.२२...... एक भाग्यवान् व्यापारी wwwww वाचण्याची त्यांना अतिशय आवड आहे. नानक, रामदास, बायबल, कुराण; कबीर, तुकाराम, तसेच अनेक संतांचे दोहे, अभंग, त्यांच्या ग्रंथांचाहि त्यांनी चिकित्सकपणे अभ्यास केला. स्वजातीच्या धर्ममंदिरांतून तेवढें जावयाचे असा त्यांचा कटाक्ष नसून अन्य धर्मियांच्या मंदिरांतूनहि ते जाण्यास नेहमी उत्सुक असतात. उत्साह, निरलसपणे कर्तव्य करीत रहाणे, हा त्यांचा मोठा कार्यक्रम. आळस, दुपारची झोप या गोष्टी त्यांना जन्मांत माहीत नाहीत.
दानधर्म करावयाचा पण तो अन्नाच्या रूपाने, कापडाच्या रूपांत करावयाचा, असा त्यांचा कटाक्ष आहे. 'ज्ञानदान' ही मुख्य गोष्ट; नंतर 'अन्नदान आणि वस्त्रदान ! ' वस्त्रदानाची त्यांची पद्धत फार विचारार्ह आहे. म. गांधींच्या जवळहि ते पुष्कळ काळ बसले; परंतु म. गांधींच्या मतांशी ते संपूर्ण सहमत झाले नाहीत. कलकत्ता, अहमदाबाद, मुंबई, कोकानाडा, गया, लाहोर, अमृतसर ठिकाणच्या अनेक काँग्रेसच्या अधिवेशनांना ते उत्साहाने हजर राहिले; पण त्यांचे म्हणणे असे की, जेलमध्ये जाऊन देशसेवापूर्ति करण्यापेक्षा, देशभक्ति करता करतां जे लोक तुरुंगांत गेलेले आहेत, त्यांच्या कुटुंबियांना, अन्न-वस्त्र पैसा, यांची मदत करणें अगर करीत राहणे, हे आपण अधिक महत्त्वाचे समजतों, असें त्यांचं निश्चित मत आहे. त्याचप्रमाणे म. गांधींच्याहि पूर्वीपासून श्रीहरगोविंद दास देशी कपडा वापरत आले आहेत.
" व्यापार म्हटला की तेथे दुसन्याचा पैसा मालाच ! तो प्रामाणिक
पणे घेणे, हीच मोठी अवघड कला आहे." Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com