________________
गुरु-शिष्य
जातात, ते आपले हित पाहतात. व्यवहारात काही अडचण आली तर त्यांना विचारायला जावे लागते. व्यावहारिक गुरू तर हवेच, त्यांना आपण सोडायचे नाही आणि ज्ञानी पुरुष तर मुक्तीचे साधन दाखवतात, व्यवहारात हस्तक्षेप करीत नाहीत. ज्ञानीपुरुष तर मोक्षासाठी आहेत. आपल्या गुरूंचे आणि त्यांचे काही देणेघेणे नाही.
७७
आधीच्या गुरूंना सोडायचे नाही. गुरू तर राहूच द्यावे. गुरूंशिवाय व्यवहार कशा तऱ्हेने चालवाल? आणि निश्चय जाणायचे असेल तर ज्ञानी पुरुषांकडून जाणू शकतो. व्यावहारिक गुरू संसारात मदत करतात, संसारात आम्हाला जी समज लागते ती समज देतात, व पुढची सगळी मदत करतात, काही अडचण असेल तर सल्ला देतात. अधर्मापासून मुक्त करतात आणि धर्म दाखवतात. ज्ञानी तर धर्म व अधर्म दोन्हीही सोडवतात आणि मुक्तीच्या दिशेकडे घेऊन जातात. आपल्या लक्षात आले ना ? व्यावहारिक गुरू संसारात आपल्याला सांसारिक धर्म शिकवतात. कोणते चांगले काम करावे आणि कोणते वाईट काम सोडावे, या सगळ्या शुभ-अशुभच्या गोष्टी आपल्याला समजावतात. संसार तर राहणारच आहे, म्हणून ते गुरू राहू द्यावे आणि जर मोक्षास जायचे आहे, तर त्यासाठी ज्ञानीपुरुष, ते वेगळे ! ज्ञानीपुरुष, हे भगवंत पक्षाचे म्हटले जातात.
विसरू नये गुरूंचे उपकार
प्रश्नकर्ता : ‘दादांना' भेटण्यापूर्वी कुणाला गुरू मानले असेल तर ? तर त्याने काय करावे ?
दादाश्री : तर त्यांच्याकडे जायचे ना! आणि जायचे नसेल तर जायलाच पाहिजे असे अनिवार्यही नाही. आपल्याला जायचे असेल तर जावे आणि जायचे नसेल तर नका जाऊ. त्यांना दुःख होऊ नये म्हणून सुद्धा गेले पाहिजे. आपण विनय ठेवावा. येथे 'ज्ञान' घेताना मला कोणी विचारले की 'आता मी गुरूंना सोडून देऊ ?' तेव्हा मी सांगतो की, सोडू नका.' अरे, त्या गुरूंच्या प्रतापानेच तुम्ही इथपर्यंत आलात. गुरूंमुळे मनुष्य काही मर्यादेत राहू शकतो. गुरू नसेल ना, तर मर्यादाच राहत नाही आणि गुरूंना आपण सांगू शकतो की, 'मला ज्ञानीपुरुष मिळाले
4