________________
७६
गुरु-शिष्य
आता इथून निघून जाऊ.' असे स्पष्ट सांगायला नको का ? आम्ही दुकानात जातो तेव्हा सांगतो की 'भाऊ रेशमी माल नसेल तर जाऊ द्या, आम्हाला खादी नको. '
गुरू तर आम्ही ज्यांची समजून-उमजून पूजा केली असेल, आपला सगळा मालकी भाव सोपवला असेल, त्यांना गुरू म्हणता येईल. नाही तर कसले गुरू ? आपला अंधार (अज्ञान) दूर केला असेल, व त्यांनी दाखवलेल्या रस्त्यावर आपण चाललो तर क्रोध - मान - मायालोभ कमी होत जातील, मतभेद कमी होत जातील, चिंता-क्लेश अजिबात होणार नाही. क्लेश झाले तर ते गुरू नाहीच मुळी, ते सगळे खोटे आहेत!
एकाच गुरूकडे मनुष्य जन्म वाया घालवू नका
लोक तर एक गुरू करून थांबले आहेत. आपण थांबू नये. समाधान होत नसेल तर गुरू बदलावेच. जिथे आपल्या मनाचे समाधान वाढेल, असंतोष होत नसेल, जिथे मनाला थांबावेसे वाटत असेल तिथे थांबावे. नाही तर दुसरे लोक थांबले आहेत, म्हणून तुम्ही थांबू नका. कारण त्यामुळेच तर अनंत जन्म बिघडले आहेत. मनुष्यत्व पुन्हा-पुन्हा येत नाही आणि तिथे थांबून राहिलात, तर आपला जन्म वाया जाईल. असे करताकरता शोधता शोधता केव्हा तरी भेट होईल. भेट होईल की नाही ? आपल्याला मुख्य वस्तू शोधायची आहे. आणि शोधणाऱ्याला ती सापडतेच. ज्याला शोधायचेच नाही, आणि 'आमचे मित्र जिथे जातात तिथे आम्हीही जाऊ,' मग काय ? बिघडलेच सर्व.
व्यवहारात गुरू : निश्ययात ज्ञानी
प्रश्नकर्ता : आम्ही ज्यांचा गुरू म्हणून स्वीकार केला आहे ते ज्ञानी नाहीत, ज्ञानी तर आपण म्हटले जाता. तर गुरू आणि ज्ञानी दोघांना सांभाळायचे की मग गुरूंना विसरून जायचे ?
दादाश्री : आम्ही 'गुरू राहू द्या' असे म्हणतो. गुरू तर हवेतच सगळीकडे, व्यावहारिक गुरू असतील तर ते आपले हितेच्छु म्हटले