________________
गुरु-शिष्य
५१
प्रश्नकर्ता : नाही, नाही. गुरू शक्तिपात करतात ती काय क्रिया आहे?
दादाश्री : पाच फूट रुंद नाला असेल आणि त्यावरून जर उडी मारता येत नसेल, उडी मारताना त्याला पुन्हा-पुन्हा अपयश हाती लागत असेल तर आपण म्हणू, 'अरे उडी मार, मी आहे ना तुझ्या पाठीशी. ' तेव्हा मग तो उडी मारतो ! म्हणजे गुरू अशा प्रकारे हिम्मत देतात. आणखी काय करतील? तुमची हिम्मत कमी झाली आहे का ?
प्रश्नकर्ता : गुरूशिवाय तर हिम्मत कमीच पडणार ना !
दादाश्री : तर एखाद्या गुरूंना सांगा, ते तुम्हाला हिम्मत देतील आणि गुरू राजी (खुश, प्रसन्न) नसतील तर माझ्याजवळ या. गुरू राजी असतील तर माझ्याकडे येऊ नका. राजीपो (गुरूंची कृपा आणि प्रसन्नता)च संपादन करायचा आहे या जगात ! कारण गुरूंचे काय देणेघेणे ? फक्त तुम्हाला कशाप्रकारे सुख प्राप्त होईल, तुम्हाला आत्मज्ञान कसे प्राप्त होईल, हाच त्यांचा उद्देश असतो.
प्रश्नकर्ता : कित्येक गुरू शक्तिपात करतात, म्हणून मी हा प्रश्न विचारला.
दादाश्री : ते ठीक आहे. तसे करतात, ते मीही जाणतो पण याची गरज कुठपर्यंत असते? असे गुरू शक्तिपात करून दूर होतात, शेवटपर्यंत साथ देत नाहीत. ते काय कामाचे ? साथ देतील ते आपले गुरू.
प्रश्नकर्ता : चमत्कारी गुरू असतील तर तिथे जावे का ?
दादाश्री : ज्यांना काही लालूच असेल त्यांनी तिथे जावे. ते आपली सगळी लालूच पूर्ण करतील. ज्यांना वास्तविक हवे असेल, त्यांना तिथे जाण्याची गरज नाही. चमत्कार घडवून मनुष्याला स्थिर करतात ना, पण जर खऱ्या बुद्धीवंतांनी ते पाहिले तर त्यांना विकल्प उभा राहील!
गुरू कुठपर्यंत पोहोचवितात ?
दोन मार्ग आहेत, एक पायरी पायरीने वर चढण्याचा मार्ग,