________________
गुरु-शिष्य
दादाश्री : गुरूंनी दिले असेल तर चांगले फळ देते. ते मग जसे गुरू, म्हणजे हे गुरूवर अवलंबून असते.
गुरूंचे ध्यान करणे हितकारक प्रश्नकर्ता : काही गुरू त्यांचे स्वतःचे ध्यान करायला सांगतात, हे योग्य आहे की नाही?
दादाश्री : असे आहे की, ध्यान तर गुरूंच्या सुखासाठी नाही, पण आपली एकाग्रता राहावी आणि शांती राहावी यासाठी ध्यान करायचे असते. पण गुरू कसे हवेत? आपले ध्यान टिकून राहील असे हवेत.
प्रश्नकर्ता : परंतु सद्गुरूंचे ध्यान करणे योग्य आहे की अन्य भगवंताच्या स्वरूपाचे ध्यान करणे योग्य आहे ?
दादाश्री : भगवंताच्या ध्यानाविषयी माहितीच नाही तेव्हा मग काय कराल? त्यापेक्षा तर गुरूंचे ध्यान करावे. त्यांचा चहेरा तरी दिसेल! म्हणजे सद्गुरुंचे ध्यान करणे चांगले. कारण भगवंत तर दिसत नाहीत. भगवंत तर मी दाखवेल त्यानंतर भगवंताचे ध्यान होईल. तोपर्यंत ज्यांना सद्गुरू मानले आहे, त्यांचेच ध्यान करा. मी भगवंत दाखवेल, त्यानंतर तुम्हाला करावे लागणार नाही. जोपर्यंत करणे आहे, तोपर्यंत भटकणे आहे. म्हणजे काही पण करावे लागते, ध्यान पण करावे लागते तोपर्यंत भटकणे आहे. ध्यान सहज होत असते. सहज म्हणजे काहीच करावे लागत नाही, आपोआपच होत असते, तेव्हा समजावे की आता आपली सुटका झाली.
शक्तिपात की आत्मज्ञान? प्रश्नकर्ता : गुरू शक्तिपात करतात, ती काय क्रिया आहे ? त्यामुळे शिष्याला काय फायदा होतो? ती सिद्धी, आत्मज्ञानासाठी शॉट कट (छोटा रस्ता) आहे का?
दादाश्री : आत्मज्ञानच प्राप्त करायचे आहे ना तुम्हाला? तुम्हाला आत्मज्ञानाचीच गरज आहे ना? मग त्यासाठी शक्तिपाताची गरजच नाही. शक्ती खूप डीम (क्षीण) झाली आहे का? तर मग विटामिन घ्या!