________________
गुरु-शिष्य
जे गुरू धर्मध्यान करवू शकतात त्यांना गुरू म्हणता येते. धर्मध्यान कोण करवू शकतो? तर जे आपले आर्तध्यान आणि रौद्रध्यान सोडवू शकतात तेच धर्मध्यान करवू शकतील. ज्या गुरूंना कोणी शिव्या दिल्या तरी रौद्रध्यान होत नसेल तर समजावे की यांनाच गुरू करण्यासारखे आहे. आज आहार मिळाला नसेल तरी आर्तध्यान होत नाही तर समजावे की यांना गुरू करता येईल.
प्रश्नकर्ता : आर्तध्यान, रौद्रध्यान होत नसेल तर मग त्यांना सद्गुरू नाही का म्हणू शकत?
दादाश्री : सद्गुरुंजवळ तर भगवंतांचे प्रतिनिधित्व असते. जे मुक्त पुरुष असतात त्यांना सद्गुरू म्हटले जाते. गुरूंचे अजून तहेत-हेची कर्म खपायची बाकी असतात. आणि सद्गुरूंनी तर बराचशा कर्मांची निर्झरा केलेली असते. म्हणून आर्तध्यान, रौद्रध्यान होत नसेल तर ते गुरू. आणि जे हातात मोक्ष देतात ते सद्गुरू. सद्गुरू मिळणे कठीण आहे, परंतु गुरू मिळाले तरी पुष्कळ चांगले.
सद्गुरुंच्या शरणी, आत्यंतिक कल्याण प्रश्नकर्ता : मग कोणाला शरण जावे? सद्गुरूंना की गुरूंना?
दादाश्री : सद्गुरू भेटले तर त्यासारखे दुसरे काहीच नाही, पण जर सद्गुरू भेटले नाहीत तर मग गुरू केलेच पाहिजेत. भेदविज्ञानी असतील, त्यांना सद्गुरू म्हटले जाते.
प्रश्नकर्ता : तर मग प्रथम गुरू करावेत की सद्गुरू?
दादाश्री : गुरू असतील तर मार्गी लागेल ना! आणि जर सद्गुरू भेटले, तर कल्याणच करतील. जरी त्याला गुरू मिळाले असतील किंवा नसतीलही, पण सद्गुरू तर सर्वांचेच कल्याण करतात. गुरू भेटल्यावर तो योग्य मार्गावर येतो, मग त्याला वेळच लागत नाही. कारण त्याच्यात कोणतीही उलट लक्षणे नसतात. परंतु ज्याला सद्गुरुंचा हात लागला त्याचे तर कल्याणच झाले.
प्रश्नकर्ता : सत् प्राप्त झालेली माणसे आहेत का?