________________
४०
गुरु-शिष्य
तुम्हाला समजतो का? ज्यांना आपण फॉलो करतो.समोर तीन रस्ते आले तर ते ठरवतात की, 'भाऊ, ह्या रस्त्याने नाही, त्या रस्त्याने चाला.' मग आपण त्या रस्त्याने चालतो. त्यांना फॉलो करावे लागते, परंतु ते आपल्या पुढेच असतात. इकडे-तिकडे कुठे जात नाहीत. आणि दुसरे आहेत ते सद्गुरू! सद्गुरू म्हणजे आपल्याला या जगातील सर्व दुःखांपासून मुक्त करतात. कारण ते स्वतः मुक्त झालेले असतात! ते आपल्याला त्यांच्या फॉलोअर्स (अनुयायी) म्हणून ठेवत नाहीत, आणि गुरूंना तर फॉलो करत राहावे लागते, त्यांच्या विश्वासावर चालावे लागते. तिथे मग आपला शहाणपणा दाखवू नये. गुरूशी सिन्सियर राहावे. जितके सिन्सियर असाल, तितकी शांती लाभेल.
गुरू तर आपण जेव्हापासून शाळेत शिकण्यासाठी जातो तेव्हापासूनच गुरुंची सुरुवात होते, ते थेट अध्यात्म्याच्या दरवाज्यापर्यंत गुरू पोहोचवतात. पण अध्यात्मात प्रवेश करु शकत नाही कारण गुरू स्वतःच अध्यात्माच्या शोधात असतात. अध्यात्म म्हणजे काय? तर आत्म्याच्या सन्मुख होणे ते. म्हणजे सद्गुरू आपल्याला आत्मसन्मुख करतात. अर्थात हाच आहे गुरू आणि सद्गुरूंमधील फरक!
___ असे गुरू मिळाले तरी चांगले लोक गुरूला समजलेच नाहीत. हिंदुस्तानातील लोक गुरूला समजलेच नाहीत की गुरू कोणाला म्हणतात! येथे कोणीही भगवे कपडे घालून बसला असेल तर लोक त्याला 'गुरू' म्हणतात. शास्त्रातील दोनचार शब्द कोणी बोलले म्हणजे आपले लोक त्याला 'गुरू' म्हणतात, पण ते गुरू नाहीत.
एक व्यक्ती मला म्हणाली, 'मी गुरू केले आहेत.' तेव्हा मी म्हटले, 'तुझे गुरू कसे आहेत' हे तू मला सांग. आर्तध्यान-रौद्रध्यान होत नसतील तर ते गुरू. त्याशिवाय इतर कोणालाही गुरू म्हणणे हा गुन्हा आहे. त्यांना साधू महाराज म्हणू शकतो, त्यागी म्हणू शकतो, पण गुरू म्हणणे हा गुन्हा आहे. नाही तर जर सांसारिक समज हवी असेल तर वकील सुद्धा गुरू आहे, मग तर सगळेच गुरू आहेत ना!