________________
१३४
गुरु-शिष्य
कामाचे? 'कधी आजारी पडलो तर कामी येतील ना! हे संधीसाधु म्हटले जातात. संधिसाधुंजवळ आमचे काम कधीच होणार नाही. जो स्वार्थी नाही, ज्याला काहीही नको तिथे जावे. हे संधी साधणारेही स्वार्थी आणि आम्ही सुद्धा स्वार्थी ! गुरू-शिष्यात स्वार्थ असेल तर ते गुरूपणही नाही आणि ते शिष्यपणही नाही. स्वार्थ नसावा.
आपण जर चोख मनाचे असू तर त्या गुरूला सांगावे की, 'साहेब, ज्या दिवशी तुमच्यात थोडा सुद्धा स्वार्थ दिसेल त्या दिवशी मी इथून निघून जाईन. दोन शिव्या देऊन सुद्धा निघून जाईन. तेव्हा तुम्हाला मला जवळ ठेवायचे असेल तर ठेवा. हो. खाणे-पिणे हवे असेल तर तुम्हाला त्याची अडचण पडू देणार नाही. परंतु तुमच्याजवळ स्वार्थ असता कामा नये.
हो, स्वार्थ दिसणार नाही असे गुरू हवेत. परंतु आता तर लोभी गुरू आणि लालची शिष्य, दोघेही एकत्र आले, मग काय भलं होणार? मग '... दोघे खेळतात डाव' असे चालत राहते!
मुळात लालची लोक आहेत, म्हणून या धुर्तीचे चालते. खरा गुरू धूर्त नसतो. अजूनही तसे खरे गुरू आहेत. नाहीत असे नाही. हे जग काही रिकामे झाले नाही. परंतु तसे मिळणे सुद्धा कठीण आहे ना! पुण्यावंतालाच मिळतील ना!
पावले उमटवण्याचेही पैसे । मग काही पावले उमटवण्याचेही पैसे उपटतात. गुरूंनी घरात पावले उमटविली तरी पैसे घेतात. तर या गरीबांच्या घरी पावले उमटवा ना! गरीबांशी असे का करता? गरीबाकडे बघायचे नाही? एका पावले उमटवून घेणाऱ्याला मी म्हटले. 'अरे, हे तू पैसेही घालवतोस आणि वेळही वाया घालवतोस. त्यांची पावले उमटवून घेण्याऐवजी तर कोणा गरीबाचे पाऊल उमटव की ज्याच्या आत दरिद्रनारायण विराजमान आहेत. गुरूंच्या पावलांचे करायचे तरी काय?' परंतु लोक असे लालची आहेत की म्हणतील, 'पावले उमटवली तर आमचे काम होईल. मुलाच्या घरी मुलगा होईल. पंधरा वर्षांपासून मूल-बाळ नाही.'