________________
गुरु-शिष्य
१३३
प्रश्नकर्ता : परंतु सद्या तर गुरूजवळ भौतिक सुखच मागतात, मुक्ती कोणीच मागत नाही.
दादाश्री : सगळीकडे भौतिकतेच्या गोष्टीच आहेत ना! मुक्तीची गोष्टच नाही. हे तर 'माझ्या मुलाच्या घरी मुलगा होऊ दे, किंवा मग माझा व्यापार चांगला चालावा, माझ्या मुलाला नोकरी मिळावी, मला असा आशीर्वाद द्या. माझे अमके करा.' अशी अपार प्रलोभने आहेत. अरे, धर्मासाठी, मुक्तीसाठी आला आहेस की हे सगळे हवे आहे म्हणून आला आहेस?
आपल्यात एक म्हण आहे ना, 'गुरू लोभी, शिष्य लोभी, दोघे खेळतात डाव' असे व्हायला नको. शिष्य लालची आहे, म्हणून गुरू त्याला सांगेल की, 'तुझे हे होईल, आमच्या कृपेने सगळे होईल, हे होऊन जाईल' लालूच शिरली तर तिथे यश येणार नाही.
गुरूमध्ये स्वार्थ नसावा कलियुगाच्या कारणामुळे गुरूंजवळ सत्व नसते. कारण ते तुमच्यापेक्षा अधिक स्वार्थी असतात. ते स्वतःचे काम करवून घेण्याच्या मागे असतात, तुम्ही आणि तुमचे काम करवून घेण्याच्या मागे असता. असा मार्ग गुरू-शिष्याचा नसावा.
प्रश्नकर्ता : कित्येकदा बुद्धीजीवी लोक अशा खोट्या गुरूला कित्येक वर्षांपर्यंत खरे गुरू मानतात, की हेच खरे गुरू आहेत.
दादाश्री : ती तर लालूच असते. बरेच लोक लालूच असल्यामुळेच गुरू बनवतात.
आत्ताचे हे गुरू, ह्या कलियुगाचे गुरू म्हटले जातात. कुठल्या ना कुठल्या स्वार्थातच असतात की 'कोणत्या कामासाठी उपयोगी पडतील?' असा विचार ते पहिल्यापासूनच करतात! तुम्हाला भेटण्याआधीच गुरू विचार करतात की हे कुठल्या कामास उपयोगी येतील? कधी हे डॉक्टर त्यांच्याकडे गेले तर त्यांना पाहिल्याबरोबर विचार येतात की कधी तरी कामी येतील. म्हणून, 'या, या डॉक्टर' असे म्हणतील. अरे, तुझ्या काय