________________
गुरु-शिष्य
म्हणाला, 'चांगले वाटत नाही तरी पण येतातच. पण आता हे बंद कसे होतील? त्यासाठी कोणता उपाय करावा?' तुम्ही कोणता उपाय कराल? यात दोष कोणाचा? गुरूंचा?
प्रश्नकर्ता : ज्याला असे विचार येतात त्याचा.
दादाश्री : हो. म्हणून मी त्याला काय म्हटले की, 'भाऊ, तुला जर असे वाईट विचार आले ना की 'ते नालायक आहेत, इतके वाईट आहेत', तर असे विचार येणे हे आपल्या हातचा खेळ नाही. तेव्हा तुला असे बोलले पाहिजे की हे खूप उपकारी आहेत. मन 'वाईट आहेत' असे बोलत असेल तेव्हा तू 'खूप उपकारी आहेत' असे बोलावे. म्हणजे हे प्लस-माईनस होऊन संपून जाईल. म्हणून हा उपाय सांगत आहे.'
गुरूभक्ती तर खोजा लोकांची त्या वेळी तर मी त्या खोजा लोकांचे पाहिले की ते सर्व एका गुरूंना मानत होते. म्हणत होते की आमचे गुरू समर्थ आहेत! आणि एका गुरूने अमेरिकेत जाऊन विवाह केला म्हणून त्यांचे भक्त, नालायक आहेत, नालायक आहेत असे म्हणू लागले. सर्व शिष्य त्यांचे विरोधी झाले की गुरूंनी असा गुन्हा करायला नको. अरे, तुमच्या गुरूंना नालायक म्हणता? तुम्ही कोणाला नमस्कार करीत होतात? त्यावर तो म्हणाला, 'मग अशा गुरूंना नालायक नाही म्हणायचे?' मी म्हणालो, 'या खोजा लोकांना विचारा. मला त्यांची विशेषता ही वाटली की साऱ्या जगात त्यांचे भक्त मला खूप उच्च कोटीचे वाटले! त्यांच्या गुरूंनी एका परदेशी स्त्रीबरोबर विवाह केला तरी पण त्यांचे भक्त सोहळा साजरा करतात आणि आपल्या येथील एखाद्या गुरूने त्यांच्याच जातीतल्या स्त्रीशी विवाह केला तरीही मारून मारून त्यांची फजिती करतील. खोजा लोक तर त्यांच्या गुरूंनी परदेशी स्त्रीशी विवाह केला तरी सोहळा साजरा करतात. त्यांचे शिष्य तर म्हणतील, 'भाऊ, त्यांना सर्व अधिकार आहेतच. आपण मनाई करु शकत नाही!' आपण लगेच सोहळा साजरा केला पाहिजे. त्यांचे येथील सगळे अनुयायी खूप खुश झाले! त्या सर्वांनी येथे मिरवणूक काढली! गुरू जे करतात ते आपण करायचे नाही, आपण तर गुरू सांगतील ते करायचे.