________________
गुरु-शिष्य
विरोधी बनतो की, 'स्वतःचे डोके चालत नाही आणि माझे गुरू होऊन बसले आहात.' असे म्हटल्यामुळे तर उलट वाईट परिणाम होतो.
अरे, काल तर तू पाया पडत होतास आणि आज दगड मारतोस? ज्यांचे पाय पुजले, त्यांना कधी मारू नये. आणि जर मारायचे असेल तर पुन्हा कधी पाया पडू नकोस!
गुरू म्हणतील, तुम्ही अकरा वाजता इथून कोठेही जायचे नाही. मग मन आत कितीही उड्या मारू लागले तरी सुद्धा जायचे नाही. असे काही शिष्य असतात की जे गुरू जरी कसेही वागले तरी पण ते गुरूच्या अधीन राहतात. परंतु आत्ताच्या गुरूंच्या अधिनतेत, तर ते गुरू सुद्धा इतके अधिक प्रमाणात कच्चे आणि कमकुवत असतात की शिष्य चिडून म्हणतात की, 'हे कसले बरकत नसलेले गुरू भेटलेत!' असे एकदा जरी बोलतात ना, मग सगळे केले-सवरलेले धूळीस मिळते.
गुरूंनी नळ्याण्ण्व वर्षांपर्यंत सर्व चांगलेच केले असेल पण फक्त सहा महिनेच चुकीचे केले तर शिष्य सर्व काही संपवून टाकतो!
म्हणून गुरुंजवळ जर कधी अधीनतेने राहिला नसेल तर क्षणभरात सगळे संपवून टाकेल! कारण हा विस्फोटक (दारूखाना) आहे. या दुसऱ्या सगळ्या गोष्टी दारूखाना नाहीत. फक्त गुरुंजवळच दारूखाना आहे. सगळे काही केले असेल, परंतु तो दारूखाना फारच भयंकर आहे म्हणून खूप जागृत रहा, सावधान रहा, आणि जर एखादी ठिणगी उडाली तर नव्याण्ण्व वर्षे केले-सवरलेल्याची धूळधाण होईल! आणि भाजून मरेल ते वेगळेच!
तिथे उपाय करावा लागतो एक व्यक्ती मला सांगते की, 'एक मोठे संत पुरुष आहेत त्यांच्याकडे मी जातो, त्यांचे दर्शन घेतो, तरी सुद्धा आजकाल माझ्या मनात त्यांच्याविषयी वाईट विचार येतात.' मी म्हटले, 'कोणते विचार येतात?' तर त्याने सांगितले, 'ते नालायक आहेत, दुराचारी आहेत.' असे सर्व विचार येतात. मी विचारले, 'तुला असे विचार करणे आवडते?' तर तो