________________
अहिंसा
दादाश्री : तर मग तुम्ही कसे खाऊ शकता? तुमच्या ब्लडमध्ये आले नसेल तर ते तुम्हाला कसे पचेल? तुम्हाला आज पचन झाले असे वाटते, पण शेवटी तर नुकसानच होत असते. हे तुम्हाला आज समजणार नाही. म्हणून नाही खाल्ले तर उत्तम आहे. सुटत नसेल तर 'नुकसानकारक आहे, सोडले तर उत्तम आहे' अशी भावना ठेवावी.
बाकी, आपल्या या गाई कधीच मांसाहार करत नाहीत, हे घोडे आणि म्हशी सुद्धा मांसाहार करत नाहीत, आणि ते शौकही ठेवत नाहीत. खूप उपाशी असतील तरी पण मांसाहार समोर ठेवले तर ते खाणार नाहीत. इतके तर या जनावरांमध्येही असते. पण आता तर ही हिंदुंची मुले आणि जैनांची मुले, ज्यांचे आई-बाप कधी मांसाहार करीत नाहीत, तेही आता मांसाहार करण्याचे शिकले आहेत. तेव्हा मी त्यांना म्हणालो, 'तुम्हाला मांसाहार करायचा असेल तर माझी हरकत नाही पण तुम्ही स्वतः कापून खा. कोंबडी असेल, तर तुम्ही स्वतः कोंबडी कापून खा.' अरे, रक्त पाहण्याची तर शक्ती नाही आणि मांसाहार करता? रक्त पाहिले तरी किती घाबरतात! म्हणजे मी काय खात आहे याचेही भान नाही. आणि जेव्हा तू रक्त पाहशील ना तेव्हा ते तुला बघवणारच नाही, हे तर जे रक्त पाहतात ना, त्यांचेच काम. जे रक्तात खेळले असतील अशा क्षत्रियांचे ते काम आहे. रक्त पाहिल्यावर घाबरायला होते की नाही?
प्रश्नकर्ता : उबग येतो. घाबरायला होते.
दादाश्री : तर मग अशी व्यक्ती मांसाहार करूच कशी शकते? दुसरा कोणी कापतो आणि ते तुम्ही खाता हे मिनिंगलेस आहे. जेव्हा कोंबड्याला कापले जाते त्यावेळी तुम्ही त्याची किंकाळी ऐकाल ना, तर आयुष्यभर तुमचे वैराग्य जाणार नाही, एवढे प्रचंड दु:ख असते. मी ते स्वतः ऐकले होते. तेव्हा मला वाटले की अरेरे, त्यांना किती दुःख होत असेल?!
महिमा, सात्विक आहाराचा । प्रश्नकर्ता : भगवंतांच्या भक्तीत शाकाहारी लोकांना आणि