________________
प्रतिक्रमण
८३
आठवण येणे हे राग-द्वेषाच्या कारणामुळे आहे. जर आठवण येत नसेल तर पडलेला गुंता विसरून जातो. तुम्हाला कोणी फोरेनर्सची आठवण येत नाही आणि मेलेल्याची आठवण का येते? हा हिशोब आहे आणि तो राग-द्वेषच्या कारणामुळे आहे, त्याचे प्रतिक्रमण केल्यामुळे जखम मिटून जाते. इच्छा होत असतात ते प्रत्याख्यान नाही झाले त्यामुळे. स्मृतिमध्ये येत आहे ते प्रतिक्रमण नाही केले त्यामुळे.
प्रश्नकर्ता : प्रतिक्रमण मालकीभावचे असते ना?
दादाश्री : मालकीभावचे प्रत्याख्यान असते. आणि दोषांचे प्रतिक्रमण
असते.
प्रश्नकर्ता : प्रतिक्रमण केल्यावर सुद्धा वारंवार हा गुन्हा आठवत असेल तर त्याचा अर्थ असा ही, त्यातून अजून मुक्त नाही झालोत ?
दादाश्री : ह्या कांदाचे एक पड निघून गेले तर दुसरे पड मागाहून येवून उभे रहाते, असे बरेच आवरणवाले आहेत हे गुन्हे. म्हणजे एक प्रतिक्रमण केल्यावर एक आवरण जाते, असे करता करता, शंभर प्रतिक्रमण केले तर हे समाप्त होईल. काही दोषांचे पाच प्रतिक्रमण केले तेव्हा समाप्त होतात, काहीचे दहा आणि काहीचे शंभर होणार. त्याचे जेवढे आवरण असतील तेवढे प्रतिक्रमण होणार. लांब चालणार तेवढा लांब गुन्हा असणार.
प्रश्नकर्ता : आठवण येते त्याचे प्रतिक्रमण करायचे आणि इच्छा झाली त्याचे प्रत्याख्यान करायचे, हे जरा समजवा.
दादाश्री : आठवण येत आहे म्हणजे समजायचे की ह्या इथे जास्त चिकट आहे तर तेथे सतत प्रतिक्रमण करत राहिले तर सर्व सुटून
जाणार.
प्रश्नकर्ता : जितक्यावेळा आठवण येईल तितक्या वेळा करायचे?
दादाश्री : हो, तितक्यावेळा करायचे. आपण करायचा भाव ठेवायचा. असे आहे की आठवण येण्यासाठी वेळ तर पाहिजे ना ! तर त्याला वेळ मिळणार. रात्री काही आठवण येत नसणार ?