________________
प्रतिक्रमण
५१
दादाश्री : 'या, या आतमध्ये यावे' आमचे संस्कार आहेतना? म्हणून 'या, आतमध्ये यावे' म्हणतो, सर्वांना सोफावर बसवतो. सोफावर लहान बाळ झोपून गेला असेल तर झटपट उठवणार आणि बाजूला करून देणार. सोफावर बसवतो. पण मनात असे होते की, 'मेले आता कुठून आलेत हे?!'
समोरच्या माणसांसाठी आम्ही भाव बिघडवतो हे आर्तध्यान नाही पण रौद्रध्यान आहे. आणि स्वत:ची पीडा स्वत:च भोगतो त्याला आर्तध्यान म्हणतात. हा तर दुसऱ्यांची उपाधि आपल्या माथे घेवून दुसऱ्यांवर ब्लेम (आरोप) लावतो. 'अशा अवेळी कुठून टपकलेत?!'
तरी ही तेव्हा आपण काय बोलणार? आपण आपले संस्कार तर सोडणार नाही ना? हळूच म्हणणार की, 'थोडी... थोडी... थोडी...' अरे पण काय? तेव्हा म्हणतो, थोडी चहा... तेव्हा मनमोकळेपणाने बोलणारे असतात ते म्हणतात. 'चंदुभाई चहा राहू द्या ना, आता खिचडी-कढी करून टाका ना. तरी खूप होवून गेले.' मग पहा तुमच्या पत्नीची स्थिति! स्वयंपाक घरात काय होवून जाईल?
आता भगवानांची आज्ञा काय आहे, ज्याला मोक्षात जायचे आहे त्याने काय करायला हवे? 'अशा अवेळी कुठून टपकले,' असा भाव येणारच माणसाला. आतातर या दुषमकाळाचे दबाव असे आहे, वातावरण असे आहे की त्याला (असे भाव) येतील. थोर माणूस असेल त्याला पण येतील.
आता हे सर्व कशासाठी तू चित्रित आहे? बाहेर चांगले करत आहे, आणि आत उलटे चित्रित आहे. अर्थात् आपण हे जे चांगल्या रीतीने बोलवतो हे पूर्व जन्माचे फळ भोगत आहोत आणि हे नवीन (आतला भाव बिघडतो ते) पुढील जन्माचे बांधत आहोत. या वेळी कुठुन टपकले अश्या आतल्या भावामुळे आपण उल्टे कर्म बांधत आहोत.
म्हणून त्यावेळी आम्ही भगवानांजवळ माफी मागून म्हणायचे हे भगवान, माझी चुक झाली, या वातावरणच्या दबावाने बोलले गेले पण अशी माझी इच्छा नव्हती. हे भले राहोत. असे तुम्ही पुसून टाकले तो तुमचा पुरुषार्थ म्हटला जाईल.
असे होऊन तर जाणार.ते तर मोठया संयमधारीला ही होते. असा