________________
प्रतिक्रमण
म्हणजे चुक आपलीच आहे असे समजायचे. समोरची व्यक्ति भोगते आहे म्हणजे त्याची चुक तर प्रत्यक्ष आहेच पण निमित्त आपण झालो, आपण त्याला दटवले म्हणून आपली पण चुक. दादांना का भोगावे लागत नाही? कारण की त्यांची एकपण चुक राहिली नाही. आपल्या चुकीने समोरच्याला काही पण परिणाम झाला, जर काही उधारी झाली तर त्वरितच मनापासून माफी मागून जमा करून घेणे. आपली चुक झाली असेल ती उधारी झाली पण त्वरितच रोख प्रतिक्रमण करून टाकायचे. आणि जर कोणाकडून आपली चुक झाली तरी पण आलोचना, प्रतिक्रमण आणि प्रत्याख्यान करून घ्यावे. मन-वचन-कायाने, प्रत्यक्ष दादा भगवानच्या साक्षीने, क्षमा मागत च राहायचे.
२८
प्रश्नकर्ता : क्रमिकचे प्रतिक्रमण करत होतो तेव्हा डोक्यात काहीच बसत नव्हते पण आता हे प्रतिक्रमण करतो तर हलके-फुलके झाल्या सारखे वाटते.
दादाश्री : पण ते (खरे) प्रतिक्रमणच नाही ना ! ते तर सर्व तुम्ही न समजल्यामुळे उभे केलेले प्रतिक्रमण ! प्रतिक्रमण म्हणजे त्वरितच दोष कमी व्हायला हवे. आपण उलट गेलेलो, तर परत फिरलो त्याचे नांव प्रतिक्रमण. हा तर परत फिरलाच नाही आणि तेथल्या तेथेच आहे ! तेथून पुढे गेला आहे उलट !!! अर्थात् त्याला प्रतिक्रमण कसे म्हटले जाईल?
जेव्हा जेव्हा गुंता पडण्या सारखे वाटेल तेव्हा अवश्य दादाची आठवण येईलच, आणि गुंता पडणार नाही. आम्ही काय सांगतो की गुंता पाडू नका. आणि त्यातून जर कधी गुंता पडला तर प्रतिक्रमण करायचे. असा गुंता शब्द येथे लगेच समजेल. ही लोक 'सत्य, दया, चोरी नाही करायची' हे ऐकून ऐकून तर थकून गेले.
गुंतागुंतीत तसेच झोपून नाही जायचे. आत गुंता असेल तर तो तसाच ठेवून झोपून नाही जायचे. गुंता सोडवायला हवा. शेवटी काही उलगडा होत नसेल तर भगवंताकडे सतत माफी मागायची की ह्याचा बरोबर गुंता पडला आहे त्यासाठी खूप माफी मागत आहे. तरीपण उलगडा होणार. माफी हेच सर्वात मोठे शस्त्र आहे. बाकी दोष तर निरंतर होतच राहतात.