________________
७४
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
दादाश्री : तुम्हाला जशी हवी तशी डिझाईन बनवून टाकतात. आपल्या नवऱ्याला पोपटासारखा बनवतात. पत्नी म्हणेल, 'आया राम' तेव्हा तो पण बोलेल, 'आया राम.' 'गया राम' तेव्हा तो पण बोलेल, 'गया राम'. असा पोपटासारखा बनून जाईल, परंतु लोकांना हातोडी मारता देखील येत नाही ना! ही सर्व कमजोरी आहे, राग येणे ही सर्व निर्बळता आहे.
तुम्ही रस्ताने जात असाल तेव्हा ह्या घरावरुन एक दगड तुमच्या डोक्यावर पडला, आणि रक्त निघू लागले, तर त्यावेळी काय खूप रागवाल?
प्रश्नकर्ता : नाही, हे तर 'हेपन' (घडून गेले) आहे.
दादाश्री : नाही, पण तिथे का रागवत नाही? म्हणजे तुम्ही तिथे कोणाला पाहिलेच नाही तर रागावणार कसे?
प्रश्नकर्ता : कोणी जाणून-बुजून मारला नव्हता.
दादाश्री : अर्थात् क्रोधावर आपले कंट्रोल आहे. जेव्हा आपल्याला हे माहित आहे की जाणून-बुजून कोणी मारलेले नाही. म्हणून तिथे कंट्रोल ठेऊ शकता. कंट्रोल तर आहेच. मग म्हणता, 'मला क्रोध येतो.' मुर्खा, मग तिथे का क्रोध येत नाही? पोलीसवाल्याबरोबर, पोलीसवाला धमकावतो त्यावेळी क्रोध का येत नाही? आणि पत्नीवर क्रोध होतो, मुलांवर क्रोध होतो, शेजाऱ्यांवर, नोकरावर वर क्रोध येतो नी 'बॉस' (साहेब) वर का नाही येत? क्रोध माणसाला येऊ शकत नाही. ही तर त्याला स्वत:ची मनमानी करायची आहे.
प्रश्नकर्ता : घरात अथवा बाहेर फ्रेंड्समध्ये प्रत्येकांचे मत वेगवेगळे असते आणि तेथे जर आपल्या मनाप्रमाणे झाले नाही, तर मग आपल्याला क्रोध येतो? तेव्हा काय करायचे?
दादाश्री : सर्वजण स्वत:ची मनमानी करायला लागले तर काय होईल? असा विचारच कसा येईल? लगेचच असा विचार यायला हवा की सर्व जर स्वतःची मनमानी करु लागले, तर इथे समोरासमोर भांडी तोडतील, आणि खायला देखील मिळणार नाही. म्हणून स्वत:ची मनमानी