________________
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
दादाश्री : त्याला एका हद्दीपर्यंत सहन करावे. नंतर विचार करुन तपास करावा की वास्तविक आहे तरी काय. विचार कराल तर कळेल की ह्याच्या मागे काय कारण आहे ! फक्त सहन कराल तर स्प्रिंग उडेल. विचार करण्याची गरज आहे. अविचारामुळे सहन करावे लागत आहे. विचार केल्यावर समजेल की ह्यात कुठे चुकते आहे ! त्यामुळे त्याचे समाधान होईल. आत अनंत शक्ति आहे. अनंत शक्ति. तुम्ही मागाल ती शक्ति मिळेल असे आहे. हे तर आत शक्ति शोधत नाहीत आणि बाहेर शक्ति शोधतात. बाहेर कोणती शक्ति आहे ?
७३
सहन केल्यामुळेच घरात विस्फोट होतात. मनात असेच मानतात की मी किती सहन करु. बाकी, विचार करुन रस्ता काढला पाहिजे. जे संजोग मिळाले आहेत, जे संजोग निसर्ग निर्मित आहेत ह्यातून आता तू कसा निसटशील? नवीन वैर बांधायचे नसतील आणि जुने वैर सोडायचे असतील तर, त्यासाठी मार्ग काढला पाहिजे. हा अवतार वैर सोडण्यासाठी आहे. आणि वैर सोडण्याचा मार्ग आहे, प्रत्येकासोबत समभावे निकाल ! मग पहा तुमची मुले किती संस्कारी होतील!
प्रश्नकर्ता : माझ्या मैत्रिणीचा असा प्रश्न आहे की, तिचा नवरा दररोज तिच्यावर रागावतो, तर त्याचे काय कारण असेल ?
दादाश्री : ते तर चांगले आहे, लोकं आपल्याला रागावतील त्यापेक्षा पती रागवेल ते चांगले आहे, घरचा माणूस आहे ना !
असे आहे, ह्या लोहाराकडे, जाड लोखंड असेल ते जर त्याला वाकवायचे असेल त्यावेळी त्याला गरम करतात. का गरम करतात ? थंड वाकू शकत नाही म्हणून लोखंडाला गरम करुन नंतर वाकवतात. नंतर मग दोन हातोडे मारले की लगेच वाकते. आपल्याला जसे हवे असेल तसे बनते. नेहमी प्रत्येक वस्तू गरम झाल्यावरच वाकते. जितकी गरम तितकी कमजोर आणि कमजोर म्हणजे मग एक-दोन हातोडी मारून आपल्याला हवी तशी डिझाईन करुन घ्यायची त्या पतीची.
प्रश्नकर्ता: कशी डिझाईन केली पाहिजे, दादा ? हातात आल्यानंतर
करावे ?