________________
प्रस्तावना निगोदातून एकेंद्रिय आणि एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंतच्या उत्क्रांतीच्या परिणामी मनुष्याचे परिणमन झाले, तेव्हापासून युगलिक स्त्री व पुरुष दोघेही एकत्र जन्मले, लग्न केले आणि निवृत्त झाले.... अशाप्रकारे उदय झाला पती-पत्नीच्या व्यवहाराचा ! सत्युग, द्वापर आणि त्रेतायुगामध्ये प्राकृतिक सरळतेमुळे पति-पत्नीच्या जीवनात समस्या क्वचितच येत असतात. आज ह्या कलियुगात पति-पत्नी मध्ये दररोज क्लेश, कटकटी आणि मतभेद बहुधा सर्वत्र दिसतात!!! ह्याच्यातून बाहेर निघून पती-पत्नीने आदर्श जीवन कसे जगावे, याचे मार्गदर्शन ह्या काळानुसार कोणत्या शास्त्रातून मिळेल ? तेव्हा आता काय करावे? आजच्या लोकांच्या वर्तमान समस्या आणि त्या समस्यांचे त्याच्यांच भाषेत समाधान करण्याचे साधे-सरळ उपाय तर ह्या काळाचे प्रकट ज्ञानीच देऊ शकतात. असे प्रकट ज्ञानी पुरुष, परम पूज्य दादाश्रींना त्यांच्या ज्ञानावस्थेच्या तीस वर्षा दरम्यान पति-पत्नीमध्ये होणाऱ्या घर्षणाच्या समाधानसाठी विचारलेल्या हजारो प्रश्नांतून संकलन करून, येथे प्रस्तुत पुस्तकात प्रकाशित करण्यात येत आहे.
पति-पत्नीमध्ये होणाऱ्या अनेक जटील समस्यांच्ये समाधानरूपी हृदयस्पर्शी आणि कायम समाधान करणारी ही वाणी येथे सुज्ञ वाचकांना त्यांच्या वैवाहिक जीवनात एकमेकांना देवी-देवता सारखे पाहण्याची अचूक दृष्टि उत्पन्न करून देईल अशी आहे, मात्र मनापासून वाचून समजलात तरच!
शास्त्रात गूढ तत्वज्ञान उपलब्ध होत असते, परंतु ते तत्वज्ञान शब्दातच मिळत असते. शास्त्राद्वारे त्याहून पुढे जाता येत नाही. दादांचे जे शब्द आहेत, ते भाषेच्या दृष्टीने साधे-सरळ आहेत परंतु ज्ञानी पुरुषांचे दर्शन निरावरण आहे, म्हणून त्यांचे प्रत्येक वचन आशयपूर्ण, मार्मिक, मौलिक तसेच समोरच्याच्या दृष्टीकोनाला तंतोतंत समजत असल्यामुळे श्रोत्यांच्या दर्शनास सुस्पष्टपणे खोलून त्यांना अधिक उंचीवर नेऊन पोहचवितात.
व्यावहारिक जीवनात पडलेले पंक्चर कसे जोडावे (ठीक करायचे)