________________
निवेदन
आत्मज्ञानी श्री अंबालाल मुळजीभाई पटेल, ज्यांना सर्वजण 'दादा भगवान'ह्या नावाने ओळखतात. त्यांच्या श्रीमुखातून आत्मतत्त्वासाठी जी वाणी निघाली, ती रेकॉर्ड करून संकलन व संपादन करून ग्रंथरुपाने प्रकाशित करण्यात आली आहे. ह्या पुस्तकात परम पूज्य दादा भगवानांच्या श्रीमुखातून निघालेल्या सरस्वतीचा मराठी अनुवाद केला आहे. ह्यात त्यांचे उत्तम व्यवहारज्ञान आणि आत्मविज्ञान समाविष्ट आहे. सुज्ञ वाचकाने अध्ययन केल्यावर त्याला आत्मसाक्षात्काराची भूमिका निश्चित होते, असे कित्येकांचे अनुभव आहेत.
ते 'दादा भगवान' तर त्यांच्या देहात असलेल्या परमात्माला म्हणत होते. शरीर हे परमात्मा होवू शकत नाही. कारण शरीर विनाशी आहे. परमात्मा तर अविनाशी आहे आणि जे प्रत्येक जीवमात्रच्या आत आहे.
प्रस्तुत अनुवादामध्ये विशेष लक्ष ठेवलेले आहे की प्रत्येक वाचकाला प्रत्यक्ष दादांची वाणीच, ऐकत आहोत असा अनुभव व्हावा.
ज्ञानींच्या वाणीला मराठी भाषेत यथार्थपणे अनुवादित करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु दादाश्रींच्या आत्मज्ञानाचा खरा उद्देश ‘जसा आहे तसा' आपल्याला गुजराथी भाषेत अवगत होईल. ज्यांना ज्ञानाचा गहन अर्थ समजून घ्यायचा असेल, ज्ञानाचा खरा मर्म जाणायचा असेल, त्यांनी ह्या हेतूने गुजराती भाषा शिकावी, असा आमचा अनुरोध आहे.
अनुवादासंबंधी उणीवांसाठी आपले क्षमाप्रार्थी आहोत.