________________
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
दादाश्री : पुरुषांच्या कुठल्याही बाबतीत ढवळा ढवळ करु नये. 'दुकानात किती माल आला? किती गेला? आज उशिरा का आलात?' तेव्हा मग त्यांना सांगावे लागेल की, 'आज नऊची गाडी चुकली' तेव्हा पत्नी म्हणेल की, 'असे कुठे फिरत होता की गाडी चुकली?' मग ते चिडतात, त्यांच्या मनात येते की, जर देवाने पण असे विचारले असते तर त्याला पण मारले असते, परंतु इथे काय करणार आता? अर्थात् विनाकारण बाचाबाची करता. मस्त बासमती भात बनवता आणि त्यात मग खडे घालून खातात, त्यात काय चव येणार? स्त्री-पुरुषांनी एकमेकांना 'हेल्प' केली पाहिजे. पतीला काही चिंता होत असेल, तर पत्नीला असे बोलले पाहिजे की, पतीची चिंता दूर होईल. आणि पतीने पण पत्नीला त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यायला हवी. पतीलाही पण समजले पाहिजे की, पत्नीला घरी मुलं किती हैरान करत असतील? घरात काही तुटले-फुटले तर पुरुषांनी तक्रार करायला नको. पण तरीही ते ओरडतात की, 'गेल्या वर्षी चांगल्यातले डझनभर कप-बशी आणले होते, ते सर्व तुम्ही कसे काय फोडून टाकले? सर्व संपवून टाकले.' मग पत्नी मनात म्हणेल की, 'मी फोडून टाकले? मला काय ते खायचे होते, फुटले तर फुटले त्यात मी काय करु?' आता त्यावर ही भांडतात, जिथे काही घेणे-देणे नाही, जिथे भांडण्यासारखे काहीच कारण नाही तिथेही भांडतात?
डिविजन (विभाजन) तर मी आधीच, लहानपणीच करुन दिले होते की, हे स्वयंपाकघर खाते त्यांचे आणि धंद्याचे खाते माझे. लहानपणापासून घरातल्या स्त्रीने जर धंद्यातला हिशोब विचारला की माझे डोके फिरायचे. कारण ही तुमची लाईन नाही, आणि तुम्ही विधाउट एनी कनेक्शन विचारता? कनेक्शन (अनुसंधान) सहित असले पाहिजे.
त्यांनी विचारले 'ह्या वर्षी किती कमवले?' मी म्हणालो, 'आपल्याला असे नाही विचारले पाहिजे. हे आमचे पर्सनल मेटर झाले. तुम्ही असे विचारत आहात? जर मी उद्या कोणाला पाचशे रुपये देऊन आलो तर तुम्ही माझे तेल काढाल.' कोणाला तरी पैसे देऊन आलो तर म्हणाल, असे लोकांना पैसे वाटत फिरलात तर पैसे संपून जातील. असे तुम्ही माझे तेल काढाल. म्हणून पर्सनल मेटर मध्ये तुम्ही हात घालू नये.