________________
३६
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
जीवन जगायला हवे. इतके फेरफार केले तरी चांगले आहे. क्लेश तर झालाच नाही पाहिजे. तुम्हाला जितके डॉलर मिळतील, त्यात गुजारा करुन घ्या. आणि ताई तुमच्याजवळ जेव्हा पैशांची सोय नसेल, तेव्हा तुम्ही साड्या घ्यायची घाई करु नका. तुम्ही पण विचार केला पाहिजे की, नवऱ्याला संकटात टाकायचे नाही. पैशांची सोय असेल तर खर्च करा.
७. 'गाडी' चा गरम मूड हे तर रात्री कधी नवऱ्याला घरी परतायला उशीर झाला, काही कारणास्तव, हं.... इतक्या उशिरा घरी येतात का? तर काय त्यांना माहित नाही की उशीर झाला आहे. त्यांच्या मनात पण खटकत असते की, खूप उशीर झाला. त्यातून ही वाइफ असे बोलते की इतक्या उशिरा कोणी घरी येते का? बिचारा! अशा मीनिंगलेस (व्यर्थ) गोष्टी केल्या पाहिजे का? तुझ्या लक्षात येते असे? अर्थात् जेव्हा ते घरी उशिरा येतील, त्या वेळी पाहून घ्या की मूड कसा आहे? नंतर लगेच सांगा की आधी तुम्ही चहा-पाणी प्या, नंतर मग जेवायला बसा. असे बोलण्यामुळे चांगल्या मूडमध्ये येणार. मूड बिघडलेला असेल तर आपण त्यांना चहा-पाणी पाजून खुश करा. जसे पुलिसवाला आला असेल, आणि आपला मूड नसेल, तरीपण चहा-पाणी नाही का करत? मग हे तर आपले आहेत, त्यांना खुश करायला नको? आपले आहेत म्हणून खुश करायला नको? बहुतेक तुम्हा सर्वांना माहित असेल की कधी गाडी मूडमध्ये नसते, होते ना असे? गाडी गरम झाली असेल आणि आपण गाडीला काठीने मारत राहिलो तर काय होईल! तिला मूडमध्ये आणण्यासाठी थंड करावी लागते. रेडियेटर फिरवावा, पंखा चालवावा असे करता येते ना?
प्रश्नकर्ता (स्त्री) : ब्रांडी कशी सोडवायची?
दादाश्री : घरात जर तुमचे प्रेम पाहिले तर सर्व काही सोडून देतील. प्रेमासाठी सर्व काही सोडण्यास तयार आहेत. प्रेम दिसत नाही म्हणून ब्रांडीवर प्रेम करतात, इतर कशावर तरी प्रेम करतात. नाही तर बीच (समुद्र किनाऱ्यावर) वर फिरत राहतात. तुझ्या बापाने काही ठेवले आहे का इथे ? घरी जा ना! तेव्हा बोलतो, 'घरी तर मला करमत च नाही.'