________________
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
२१
पहायचे आहे की घरात बायको जास्त खेचते आहे आणि आपण पण जोरात खेचणार, दोघेही खेचणार तर मग काय होणार?
प्रश्नकर्ता : तुटून जाणार.
दादाश्री : आणि तुटल्यावर गाठ बांधावी लागते. तर गाठ बांधून चालवावे, लागेल त्यापेक्षा अखंड ठेवाल तर काय वाईट आहे ? अर्थात तिने जास्त खेचले तर आपण सोडून द्यावे.
प्रश्नकर्ता : पण दोघांपैकी सोडणार कोण?
दादाश्री : समंजस, ज्याला अक्कल जास्त आहे तो सोडून देणार आणि कमी अक्कलवाला खेचल्याशिवाय राहणारच नाही ना. म्हणजे आपण अक्कलवाले सोडून देऊ. सोडायचे, पण एकदम नाही सोडून द्यायचे. एकदम सोडून दिले तर समोरचा पडेल. त्यासाठी हळू हळू हळू हळू सोडायचे. माझ्या बरोबर जर कोणी खेचाखेची केली तर मी हळू हळू सोडून देतो, नाहीतर पडून जाईल बिचारा. आता तुम्ही सोडून द्याल असे? आता सोडता येईल न? सोडून द्याल न? सोडून द्या, नाहीतर रस्सीला गाठ बांधून चालवावे लागेल. रोज रोज गाठ बांधणे हे काय बरे वाटते? गाठ तर बांधावीच लागेल न! ती रस्सी तर चालवावीच लागते न! तुम्हाला काय वाटते? घरात मतभेद करायचे असतात का? एक अंश पण झाले नाही पाहिजे!! घरात जर मतभेद होत असतील तर यू आर अन्फिट (अयोग्य), जर हजबंड असे करेल तर तो अफिट फॉर हजबंड आणि वाइफ असे करत असेल तर ती अन्फिट फॉर वाइफ.
प्रश्नकर्ता : पति-पत्नीच्या भांडणांचे मुलांवर काय परिणाम होतात ?
___ दादाश्री : ओहोहो! खूप वाईट परिणाम होतात. इतकेसे लहान बाळ असेल, ते पण असे पहात रहाते. पप्पा माझ्या मम्मीला खूप ओरडतात. पप्पाच खराब आहेत. पण तो बोलत नाही. त्याला माहित आहे की बोललो तर मारतील मला. मनात नोंद करतो तो, नोटेड इट्स कन्टेन्ट्स पण घरात असे तुफान (भांडण) बघतो आणि मनात गाठ बांधतो की मोठा झाल्यावर