________________
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
प्रश्नकर्ता : नाही, तसे तर छोट्या छोट्या गोष्टीवरच मतभेद होतात.
दादाश्री : अरे, छोट्या छोट्या गोष्टीवर मतभेद होतात, हा तर इगोइझम (अहंकार) आहे. म्हणून जेव्हा ती बोलेल की 'असे आहे. तेव्हा तुम्ही बोला, 'बरोबर आहे.'असे बोललात तर मग काही होणार नाही. पण आपण तिथे आपली अक्कल वापरतो. अक्कलशी अक्कल भांडते म्हणून मतभेद होतात.
प्रश्नकर्ता : 'बरोबर आहे' असे तोंडाने बोलण्यासाठी आम्ही काय करायला हवे? आम्ही असे बोलू शकत नाही, हा अहम् कसा दूर करावा ?
दादाश्री : असे बोलू शकत नाही, खरे आहे तुमचे. ह्यासाठी काही दिवस प्रेक्टिस करावी लागेल. मी सांगितलेले उपाय करण्यासाठी थोडे दिवस प्रेक्टिस करा ना! त्यानंतर ते फिट होणार. एकदम नाही होणार.
प्रश्नकर्ता : मतभेद का होतात? ह्याचे कारण काय?
दादाश्री : मतभेद होतात, तेव्हा हा समजतो की मी अक्कलवाला आणि ती समजते की मी अक्कलवाली, अक्कलेचे बारदान! विकायला गेलात तर चार आणे पण मिळणार नाही! त्यापेक्षा आपण शहाणे होऊन जा, तिच्या अक्कलेला आपण बघावे की ओहोहो.... किती अक्कलवाली आहे ! तेव्हा मग ती पण शांत होऊन जाईल. पण हे तर आपण ही अक्कलवाले आणि ती ही अक्कलवाली, अक्कलच जिथे भांडू लागेल, तिथे काय होणार मग?!
तुम्हाला मतभेद जास्त होतात की त्यांना जास्त होतात? प्रश्नकर्ता : त्यांना जास्त होतात.
दादाश्री : ओहोहो! मतभेद म्हणजे काय? मतभेद याचा अर्थ तुम्हाला समजावतो. हा रस्सी-खेच चा खेळ होतो न, तो पाहिलाय तुम्ही ?
प्रश्नकर्ता : हो.
दादाश्री : दोन-चार जण ह्या बाजूला खेचतील तर दोन-चार जण त्या बाजूला खेचतील. मतभेद म्हणजे रस्सीखेच. अर्थात् आपल्याला हे