________________
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
ज्याने फाडला त्याच्यावर द्वेष होतो. अरे मुर्खा! फेकून ये. ज्या वस्तूमुळे घरात भांडण लागले, ती वस्तू बाहेर फेकून द्या.
जितके समजेल तितकी श्रद्धा बसत जाईल. तितकेच फळ देईल. हेल्प (मदत) करेल. श्रद्धा बसली नाही तर ते हेल्प पण करणार नाही. म्हणून समजदारीने चाललात तर आपले जीवन सुखी होईल, आणि तिचे जीवन पण सुखी होईल. अरे, तुमची पत्नी तुम्हाला गरमागरम भजी आणि जिलेबी बनवून देत नाही का?!
प्रश्नकर्ता : बनवून देते ना?
दादाश्री : हो तर मग? तिचे उपकार मानत नाही, कारण की ती आपली पार्टनर आहे. त्यात तिचे कसले उपकार? असे म्हणतात. आपण पैसे आणतो आणि ती आपल्याला हे सर्व बनवून देते, अशी दोघांची पार्टनरशीप चालते. मुले पण पार्टनरशीप मध्ये येतात, काय तिच्या एकटीची थोडेच आहेत?! तिने मुलांना जन्म दिला आहे म्हणून तिच्या एकटीचीच आहेत? दोघांची आहेत मुले, दोघांची की एकटीची?
प्रश्नकर्ता : दोघांची.
दादाश्री : हं मुलांना जन्म काय पुरुष देणार होते? अर्थात् हे जगत समजण्यासारखे आहे! काही बाबतीत समजण्यासारखे आहे. आणि ते ज्ञानी पुरुष समजावतात, त्यांना काही घेणे-देणे नसते, म्हणून ते समजावतील की, भाऊ, हे एवढे आपल्या हिताचे आहे, तेव्हा मग घरात काही क्लेश कमी होतील, तोड-फोड कमी होतील.
कृष्ण भगवानांनी सांगितले आहे, दोन प्रकारची बुद्धि, अव्यभिचारिणी आणि व्यभिचारिणी. व्यभिचारिणी म्हणजे दुःखच देते आणि अव्यभिचारिणी बुद्धि सुखच देते, दुःखातून सुख शोधून काढते. आणि हे तर बासमती तांदुळात खडे घालून खातील मग. इथे अमेरिकामध्ये खायचे सामान किती चांगले, शुद्ध तूप मिळते, दही मिळते किती छान जेवण मिळते, जीवन सरळ आहे, तरीही जीवन जगता येत नाही म्हणून मार खातात ना लोक.
आपल्या हिताचे काय आहे त्याचा तरी विचार करायला हवा ना!