________________
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
हा कुठला प्रकार! मनमानी करायला जाते पण नाही करू शकली तर मग काय होईल? असे सगळे नाही केले पाहिजे. स्त्रियांनो, आता मोठ्या मनाच्या व्हा.
प्रश्नकर्ता : स्त्रिया स्वत:च्या अणूंनी पुरुषांना विरघळून टाकतात आणि स्वत:चे जे खोटे असले ते ही खरे करून घेतात, या बाबतीत आपले काय म्हणणे आहे.
दादाश्री : गोष्ट खरी आहे. ह्याचा गुन्हा त्यांना लागतो आणि असे खोटे आग्रह करतात ना त्यामुळे विश्वास तुटून जातो.
ज्यांचे पती भोळे आहेत त्यांनी बोट वर करा पाहू. ज्यांनी बोट वरती केले ना, त्या मला येऊन खाजगीत सांगतात, की आमचे 'पती भोळे आहेत, सर्वच भोळे आहेत.' हे इटसेल्फ सुचवतात की, ह्या स्त्रिया तर पतीना खेळण्या प्रमाणे नाचवतात. पण हे जर जाहीर केले तर खराब दिसेल. खराब नाही दिसणार?! जास्त बोलण्यासारखे नाही. खाजगीत स्त्रियांना विचारले की. 'ताई, तुमचे पती भोळे आहेत?' तर म्हणेल 'खूपच भोळे.' कपटचा माल भरलेला आहे त्यामुळे. परंतु असे बोलू नये, खराब दिसेल. त्यांच्यात इतर गुण खूप सुंदर आहेत.
प्रश्नकर्ता : स्त्रियांना एकीकडे लक्ष्मी बोलले जाते, आणि दुसऱ्या बाजूला कपटवाली, मोहवाली.....
दादाश्री : लक्ष्मी म्हणतात, तर काय ती अशी-तशी आहे? जर पतीला नारायण म्हटले जाते तर मग तिला काय म्हणाल? अर्थात् त्या जोडीला लक्ष्मी नारायणचा जोडा म्हणतात! तर मग स्त्री काही खालच्या दर्जाची आहे? स्त्री तर तीर्थंकरांची माता आहे. जेवढे चोवीस तीर्थंकर झाले, त्यांची माता कोण?
प्रश्नकर्ता : स्त्रिया.
दादाश्री : तेव्हा त्यांना खालच्या दर्जाची कसे बोलू शकता? स्त्री झाली अर्थात मोह तर असणारच पण जन्म कोणाला दिला, तर सर्व मोठमोठ्या तीर्थंकरांना जन्म दिला, सर्वच महान लोकांना जन्म तिनेच दिला आहे