________________
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
९१
असतात. पांढरा शुभ्र माल भरला असेल तर पांढरा शुभ्र निघेल. काळा भरला असेल तर काळा निघेल. प्रकृती देखील भरलेला मालच आहे. जो माल भरलेला आहे त्याचे नांव प्रकृती, आणि त्यालाच पुद्गल म्हणतात. पुद्गल म्हणजे जे पुरण केले त्याचे गलन होतच राहते. जेवणाचे पुरन केले, तर त्याचे संडासात गलन होते. पाणी पीले, तर त्याचे लघवीत, श्वासोश्वास हे सर्व पुद्गल परमाणु आहेत.
पुरुष व्हायचे असेल तर, मोह आणि कपट हे दोन गुण सुटले की काम होईल. मोह आणि कपट हे दोन प्रकाराचे परमाणु एकत्र आले की स्त्री बनते. आणि क्रोध आणि मान हे दोन परमाणु एकत्र आले की पुरुष बनतो. अर्थात् परमाणुच्या आधाराने हे सर्व घडत असते.
___ एकदा स्त्रियांनी मला विचारले की, आमच्यात काही विशेष प्रकारचे दोष असतात, त्यापैकी जास्त नुकसानकारक दोष कोणता? तेव्हा मी म्हणालो, स्वतःचे खरे (मनमानी) करवून घेता तो. सर्व स्त्रियांची इच्छा अशी असते की, आपल्या मर्जीनुसार करायची. पतीला देखील उलट मार्गावर नेऊन, त्यांच्याकडून स्वत:चे खरे करवून घेतात. हा खोटा, आणि उलटा मार्ग आहे. मी त्यांच्याकडून लिहून घेतले आहे की हा रस्ता नसावा. मनमानी करण्यात काय अर्थ आहे! खूप नुकसानकारक आहे!
प्रश्नकर्ता : ज्यात कुटुंबाचे भले होत असेल, असे आपण जर करवून घेतले तर ह्यात काय चुकीचे आहे?
दादाश्री : नाही, त्या भलं करुच शकत नाही ना! ज्या स्वत:च्या मर्जीनुसार करवून घेतात, त्या कधीही कुटुंबांचे भले करुच शकत नाही. कुटुंबाचे भले कोण करु शकते तर 'सगळ्यांच्या मर्जीनुसार झाले तर ते योग्य' असा विचार करेल तीच कुटुंबाचे भले करु शकते. एकाचेही मन दुखावणार नाही अशाप्रकारे झाले तर. ज्या मनमानी करायला जातात त्या तर कुटुंबाचे खूप नुकसान करतात. आणि हेच तर वादविवाद आणि भांडणाचे साधन आहे. परत स्वतःच्या मर्जीनुसार करता येत नाही म्हणून तर खात नाही, दुःखी होऊन मन मारून बसून राहते. कोणाला मारायला जाणार, मन मारून बसून राहते. पण मग दुसऱ्या दिवशी परत कपट करते.